शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वाड्यात श्रमजीवीने वाचला समस्यांचा पाढा

By admin | Published: August 02, 2016 3:30 AM

आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण झाली.

वाडा : आदिवासी बहुल पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊन दोन वर्ष पूर्ण झाली. मात्र या कालावधीत शासनाच्या निष्क्रिय धोरणामुळे जिल्ह्यातील कुपोषण, बेरोजगारी, आरोग्याच्या समस्यात अधिकच भर पडल्याने व त्या सोडविण्यात शासन अपूरे पडल्याने त्या विरोधात शासनाला जाग यावी म्हणून श्रमजीवी संघटनेने आदिवासींच्या पारंपारिक रवाळ पध्दतीने देवाला साकडे घालून सोमवारी तहसील कार्यालया समोर अनोखे आंदोलन केले. १ आॅगस्ट २०१४ रोजी पालघर जिल्ह्यÞाची निर्मिती झाली. ज्या कुपोषण आणि बालमृत्यू व आरोग्याचा समस्यांवर पालघर जिल्ह्यÞाची निर्मिती झाली. ते प्रश्न अधिक गंभीर बनून सरकार उदासिन असल्याचे दिसते. जिल्ह्यÞात महिला व बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांची फक्त तीन पदे भरली असून आठ पदे रिक्त आहेत. आदिवासी विकास विभागाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या अब्दुल कलाम सकस आहार योजनेचा पुरता बोजवारा उडाला. या योजनेत गर्भवती महिलेस सातव्या महिन्या पासून सकस आहार दिला जातो. पंरतु तीही योजना गंभीर पणे राबविली जात नसल्याने कुपोषणाच्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्ह्यÞात आरोग्य सेवेची दुर्दशा झाली असून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ग्रामीण रूग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ, भुलतज्ञ नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांची परवड अधिक वाढली आहे, असे आरोप यावेळी करण्यात आले. खरंतर या जिल्हा निर्मिती नंतर आदिवासी भागातील प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने पाहायला हवे होते. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे आदिवासी भागातील जनतेला मरणयातना भोगाव्या लागत आहेत. अशा उदासीन सरकारला जाग यावी म्हणून श्रमजीवी संघटनेने आदिवासींच्या देवाला साकडे घालण्याच्या पारंपरिक रवाळ पध्दतीने पूजा घालून गाणी गात तहसील कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले.पूर्वीच्या काळी ग्रामीण आदिवासी भागात वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसल्याने आदिवासी समाज आपली पारंपरिक उपचार पद्धती अवलंबित असे. आजही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अभावी जिल्ह्यÞातील आरोग्य यंत्रणा कोलमडल्याने आदिवासींवर पुन्हा अंधश्रद्धा जोपासत भगतिगरी व बुवाबाजीवर अवलंबून राहावे लागणार असल्याचा प्रसंग ओढवणार आहे. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून रवाळ पध्दतीने आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष मिलिंद थुले, संघटक सरिता जाधव, जयराम बरफ, बाळाराम पाडोसा यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)जव्हारमध्येही आंदोलनजव्हार : श्रमजीवी संघटनेकडून सरकारला शुद्ध येण्याकरीता जिल्ह्यातील प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी आदिवासी रवाळ भरवून नवस बोलण्यात आले. संघटनेकडून हे आंदोलन सोमवार तहसील कार्यालयाच्या आवारात आदिवासीसमाजाचे तारपा व इतर वाद्य वाजवून रवाळ पध्दतीने देवालासाकडे घालण्यात आले. ठाणे जिल्ह्रयाचे विभाजन होऊन आदिवासी बहूलक्षेत्र असलेल्या पालघर जिल्हयाची निर्मिती होऊन १ आॅगस्ट २०१६ रोजी २ वर्ष पुर्णझाली. दोन वर्षापुर्वी निवडणूका डोळयासमोर ठेवून कुठलीही पूर्व तयारी नसताना जिल्हयाची निर्मिती झाली. परंतु जिल्हयासाठी आवश्यक असलेले प्रशासन व त्यसाठी लागणारे मनुष्याळ आपल्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने पालघर जिल्हयाला अद्याप दिलेले नाही हे संघटनेद्वारे निदर्शनास आणले आहे.