धनश्री भावसार-बगाडे/
हिनाकौसर खान-पिंजार - पुणो
केंद्रीय अर्थसंकल्पाची चर्चा होत असताना गृहिणींचा अर्थसंकल्प महागाईने कोलमडला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2क् ते 25 टक्के खर्च वाढला आहे. उत्पन्नात मात्र या प्रमाणात वाढ झालेली नसल्याने कमाई आणि खर्चाचा ताळमेळच बसेनासा झाला आहे.
जीवनावश्यक गोष्टींचा खर्च भागवतानाही दमछाक होत आहे. मटकी, वाटाणा, चवळीही 6क् रुपये किलोंवर गेली आहे. रोजच्या गरजेतील असलेल्या पालेभाज्यांचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींना पालेभाज्यांना पर्याय शोधताना नाकीनऊ येत आहेत. पावसानेही ओढ दिल्याने भाजीपाल्याचे भाव मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. 5 रुपयांना मिळणा:या पालेभाज्यांसाठी सध्या 2क् रुपये मोजावे लागत आहेत. भाज्यांचे भाव वाढल्यावर ऐरवी बटाटा- कडधान्याकडे वळता येत होते. मात्र, कांदा-बटाटाच 3क् रुपये किलोंवर गेला आहे. आमटी करावी म्हटले, तर तूरडाळ 75 रुपये किलो, तर मूगडाळ 11क् रुपये किलोवर गेली आहे. काकडी 4क् रुपये किलोंवर गेली. फळांचा तर आता विचारही करणो सामान्यांना शक्य होईनासे झाले आहे. इतर फळांना घेणो सर्वसामान्यांना परडवत नसल्याने बहुतेकदा केळी खाणो पसंत करतात. मात्र, आता केळासारखे फळही 4क् रुपये डझन झाल्याने केळी खाण्यापूर्वीही लोकांना विचार करावा लागत आहे. जून महिन्यात मुलांच्या शालोपयोगी साहित्यात बचत खर्च झाली. तसेच बहुतांश शाळांनीही 1क् टक्के फी वाढविली. त्याचबरोबर व्हॅनच्या शुल्कातही 1क् टक्के वाढ झाली आहे. अनेक घरांत आता मोलकरीण ठेवणो परवडेनासे झाले आहे. धुणो, भांडी आणि फरशी पुसण्यासाठी पूर्वी 6क्क् रुपये घेतले जायचे. महागाईमुळे 15क्क् रुपये झाले आहेत. त्यामुळे गृहिणी मोलकरणी कमी करायला लागल्या आहेत. पेट्रोलचा खर्च वाढत चालला आहे. पती-पत्नी दोघे दुचाकी वापरत असतील, तर आता हा खर्च साडेतीन हजारांर्पयत गेला आहे. औषधांचा खर्चही 1क् ते 15 टक्क्यांर्पयत वाढला आहे. महिन्याला किमान 6क्क् रुपये खर्च औषधांसाठी होतो. गृहकर्ज घेऊन फ्लॅट घेतलेल्या कुटुंबांची तर तारेवरची कसरत सुरू आहे. उत्पन्न वाढेल या आशेने कर्जाचे हप्ते ठेवले होते. मात्र, हप्ता वाढला. घरखर्चही वाढले, मात्र उत्पन्न तेच राहिले. त्यामुळे हप्ता भागविणोही अवघड होऊन बसले आहे.
महागाईची झळ प्रत्येकालाच बसते. कारण पगार जेवढा वाढतो यापेक्षा दुप्पट वेगात महागाई वाढत आहे. परंतु वाढत्या पगाराबरोबर समाजात वावरण्याचे नियमही बदलत असतात. त्यामुळे परत फिरून विषय घराच्या बजेटकडेच वळतो. भाजीपाल्याच्या खर्चाबरोबरच फळे, दूध, प्रवास या सगळ्याच्याच खर्चात वाढ झाली आहे. हे खर्च टाळता येण्यासारखे नसल्याने त्यातल्या त्यात स्वस्त काय? याचा विचार करून खर्च करावा लागत आहे. आधी म्हशीचे दूध 32 रुपये होते. जे आता 5क् रुपये झाल्याने आम्ही ते दूध घेणोच बंद केले आणि आता गाईचे दूध 38 रुपये लिटरने घेतो. डाळी, गहू, तांदूळाचे दर वाढल्याने किराण्याच्या खर्चातही 1क् टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढत आहे. या सगळ्याचा ताळमेळ बसविणो खरंच जिकिरीचे होऊ लागले आहे.
-सविता धारवाडकर, गृहिणी
कामानिमित्त पुणो ते भिगवण रोजचं अपडाऊन आहे. वाढलेल्या पेट्रोल-डिङोलच्या भावाने प्रत्येक प्रवासामागे 2क् रूपयांनी वाढ झाली आहे. सामान्य माणसासाठी दर दिवसाचे वाढीव 2क् रूपये ही खूप मोठी किंमत असते. महिन्याच्या बचतीचे गणितच बिघडते. घरातील प्रत्येकाचे आरोग्य सांभाळण्यासाठी समतोल आहार द्यावा, अशी आपली अपेक्षा असते. मात्र, भाजीपाल्याचीही भाववाढ असल्याने भाज्या विकत घेताना तर नेमके काय खावे हेच कळत नाही. केवळ आपले पोट भरणो ही एवढीच आजची गरज झाली आहे.
-श्रवणी चिटणीस, गृहिणी
कांद्याची भाववाढ सतत होत असल्याने घरात कांद्याशिवायच किंवा अगदी कमी कांदा वापरून भाज्या बनवतो. अशा परिस्थितीत तर घरात एक पाहुणा आला,तरी खूप मोठी अडचणीची गोष्ट होत आहे. शिवाय मी गृहिणी असले तरीसुद्धा बाहेरची बरीच कामे मलाच करावी लागतात. त्यानिमित्ताने तसेच मुलांना टय़ूशन, शाळेत सोडायला आणायला जावे लागते. त्यामुळे वाढलेल्या पेट्रोल दराचा मोठाच फटका माङया महिन्याच्या नियोजनाला बसतो. यामुळे दर महिन्याला बजेटमध्ये 1 हजाराहून अधिक वाढ होणार आहे. त्याचा परिणाम इतर गोष्टींवर होणार आहे. अशा परिस्थितीत आजारपण आले, तर उपचारासाठी पैसे कोठून आणायचे, हा प्रश्न माङयासमोर पडला आहे.
-अपूर्वा साठे, गृहिणी