बारामती : ‘बच्चों आप कैसे हो? आप क्या कर रहे हो? कितने देर से रुके हो?’ असा संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांशी साधला. त्यामुळे पंतप्रधानांना जवळून पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. पंतप्रधान मोदी यांनी विद्या प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटन केले. या वेळी हातात तिरंगा घेतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. या स्वागताने पंतप्रधान भारावले. त्यानंतर या चिमुकल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी मुक्तपणे संवाद साधला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना जवळ घेतले. तसेच, विद्यार्थ्यांसमवेत छायाचित्र काढली.‘आप क्या कर रहे हो? कितने देर से रुके हो...?’ या पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थी काही क्षण नि:शब्द झाले. मात्र, काही क्षणातच विद्यार्थी बोलते झाले. ‘सर... आप के वेलकम के लिए हम रुके है. थँक यू सर...’ असे सांगून पंतप्रधानांशी संवाद साधला. स्कूल कॅप्टन कृष्णकांत सोनी, वृषाली खैरे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने पंतप्रधानांचे स्वागत केले. प्राचार्या नीला खरोसेकर यांनी शाळेची माहिती दिली. पंतप्रधानांनी चार-पाच मिनिटे विद्यार्थ्यांसमवेत घालवली. विद्यार्थ्यांमध्ये मात्र पंतप्रधानांशी झालेली प्रत्यक्ष भेट, संवाद आनंददायी ठरला. विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ए. व्ही. प्रभुणे, रजिस्ट्रार प्रणव चक्रवर्ती उपस्थित होते.४ कितने देर से रुके हो...?’ या पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थी काही क्षण नि:शब्द झाले. मात्र, काही क्षणातच विद्यार्थी बोलते झाले. ‘सर... आप के वेलकम के लिए हम रुके है. थँक यू सर...’ असे सांगून पंतप्रधानांशी संवाद साधला.
बच्चों आप कैसे हो?
By admin | Published: February 14, 2015 10:57 PM