ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २५ - अॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा, असं वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. कोपर्डीला भेट दिल्यानंतर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. बलात्कार करणा-यांसाठी शरियतसारखे कठोर कायदे लागू करून बलात्का-यांना कठोर शिक्षा केली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी कोपर्डी येथे जाऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी बलात्कार करणा-यांचे हात, पाय तोडले पाहिजेत, असे सांगत शरियतसारखा कायदा लागू करण्याची गरज असल्याते मत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनीही सर्व पातळ्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे--मुख्यमंत्र्यांनी सर्व पातळीवर लक्ष ठेवलं पाहिजे.-आठवलेंनी मुख्यमंत्र्यांना मूर्ख बनवलं-कुणाची बलात्कार करण्याची हिंमत होऊ नये-गुन्हेगारांना कायद्याची भीती नाही-अॅट्रॉसिटीचा फेरविचार करणं गरजेचं-कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच असला पाहिजे-अॅट्रॉसिटी कायद्याचा पुनर्विचार व्हायला हवा-इतर देशांप्रमाणे भारतातही कठोर कायदे हवेत-मुख्यमंत्र्यांकडे कोणतंच खातं असता कामा नये
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा- राज ठाकरे
By admin | Published: July 25, 2016 7:15 PM