पुणे : कारागृहात असणारी कैद्यांची संख्या लक्षात घेता त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी न्यायालयाने ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात येणार आहे. असे आदेश दिले आहेत. मात्र या कैद्यांना सोडण्यात आल्यानंतर ते घरी जाणार कसे हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. सध्या राज्यात संचारबंदी आहे. या कारणास्तव सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक नव्हे तर परजिल्ह्यातील कैदी घरी कसे पोहचणार ? हा नवीन प्रश्न समोर आला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन.पी.धोटे यांनी याबाबत परिपत्रक काढले असून सत्र व जिल्हा न्यायाधीश यांना दिले आहे. शुक्रवारपर्यत ५० ते ६० आरोपीना वैयक्तिक जातमुचलक देण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली. कैद्यांना घरी जाण्यास येणाऱ्या अडचणी बाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, तुरुंग अधीक्षक यांच्याशी याविषयी बोलणे झाले आहे. कैद्यांना तुरुंग प्रशासनाकडून पत्र देण्यात येणार आहे. त्यात कैदीला जामिनावर सोडण्यात आल्याचा उल्लेख करण्यात येईल. ते पत्र त्यांना पोलिसांना दाखवता येईल. स्थानिक कैद्याना कुठली अडचण येणार नाही. मात्र जे जिल्ह्याबाहेरील कैदी आहेत त्यांचा प्रश्न आहे. न्यायालयाच्या नियमानुसार राज्याच्या बाहेरील कैद्यांना सोडण्यात येणार नाही. न्यायालयाची भूमिका ही जेलमधील कैदी कमी करण्यावर आहे. कैद्यांच्या घरी जाण्याबाबत अन्य उपाययोजना राज्य प्रशासनकडून व्हायला हवी. तो प्रश्न न्यायालयाच्या कक्षेत येत नाही. कारागृहातून कैद्यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली जाईल. त्यानंतर त्यांनी घरी कसे जावे याबद्दल राज्य प्रशासन यांनी योग्य तो निर्णय घ्यावा. मात्र तरी देखील तुरुंग प्रशासन कैद्यांना पत्र आणि न्यायालयाच्या आदेशाची प्रत देणार आहे. असे बोलणे तुरूंगअधिकारी यांच्याबरोबर झाले आहे. मात्र अद्याप अन्य कुठले निर्देश आले नसल्याची माहिती भागवत यांनी दिली. ज्या गुन्हयात ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा झाली व ते आरोपी महाराष्ट्रात राहतात अशा आरोपीना वैयक्तिक जातमुचलक्यावर आदेशात नमूद करण्यात आले आहे. केले आहे.
कारागृहातून सोडल्यावर परजिल्ह्यातील कैदी घरी जाणार कसे ? संचारबंदीमुळे सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 11:01 PM
७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात येणार
ठळक मुद्देस्थानिक नव्हे तर परजिल्ह्यातील कैदी घरी कसे पोहचणार ? हा नवीन प्रश्न