शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
2
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
3
अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म
4
एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे
5
"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम एक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्मूला
6
Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!
7
"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
8
दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...
9
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
10
धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री
11
IND vs NZ: मुंबईत गेली १२ वर्ष भारत अजिंक्य! शेवटचा विजय न्यूझीलंडविरूद्धच... पाहा आकडेवारी
12
अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!
13
Stock Market: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात, Sensex ३०० अंकांनी आपटला
14
"हा निर्णय कठीण होता, पण...", सई ताम्हणकरने अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली
15
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
16
मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश
17
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
18
वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत
19
शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ!
20
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग

सरकारला लाज कशी वाटत नाही? प्रचारादरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी विचारणार सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 6:27 PM

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचार अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षातल्या अपयशी कारभाराची माहिती जनतेसमोर मांडली जाणार आहे.

मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचार अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षातल्या अपयशी कारभाराची माहिती जनतेसमोर मांडली जाणार आहे. पाच वर्षापूर्वी दिलेल्यापू आश्वासनांचा र्तता ना करताना पुन्हा मते मागायला येताना सरकारला लाज कशी वाटत नाही या टॅगलाईनच्या माध्यमातून महाआघाडी सरकारला जनतेच्या मनातील प्रश्न विचारणार आहे, अशी माहिती काँग्रेस खा.हुसेन दलवाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.  काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद आज गांधीभवन येथे झाली. यावेळी महाआघाडीची एकत्रित प्रचार यंत्रणेची आणि प्रचारातील मुद्द्यांची माहिती, तसेच ऑडीओ, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप शिवसेनेवर कशापध्दतीने सरकारवर हल्लाबोल केला जाणार आहे याची माहिती सादरीकरणासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांनी दिली.यावेळी  खा. दलवाई म्हणाले की मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे झाले असून,  मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे गरीब, शेतकरी, कष्टकरी, तरूण, विद्यार्थी, छोटे व्यापारी दलित अल्पसंख्यांक, आदिवासी असे सर्वच समाज घटक अडचणीत आले आहेत . मोदींनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत मते मागायला येण्याच्या आधी मागच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचे काय झाले ते अगोदर सांगा? अशी जनतेची भावना आहे. सरकारने दरवर्षी दोन कोटी नोक-या देण्याचे आश्वासन पाळले नाही उलट तरूणांना पकोडे तळण्याचा सल्ला दिला. नोक-या मागणा-यांना पकोडे तळायला सांगताना लाज कशी वाटत नाही? मुली पळवून नेण्याची भाषा करणा-यांना मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही? शाळा बंद करून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणा-या सरकारला पुन्हा मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही. पंधरा लाखाचे आश्वासन देऊन फसवणूक करणा-यांना मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही?ऑनलाईनच्या नावाखाली शेतक-यांना कर्जमाफी नाकारणा-या सरकारला मते मागताना लाज कशी वाटत नाही? हे जनतेच्या मनातील प्रश्न महाआघाडी सरकारला विचारणार आहे असे खा. दलवाई म्हणाले.यावेळी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, देशभरातील ३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पण वर्ध्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांविषयी २ मिनिटेही बोलले नाहीत. गेल्या पाच वर्षातील शेतक-यांच्या दुरावस्थेसाठी मोदी मागच्या सरकारला दोष आहेत मग मोदींनी गेल्या पाच वर्षात नेमके काय केले? असा संतप्त सवाल मलिक यांनी केला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना शरद पवारांमुळे गुजरातचा विकास झाला हे सांगणारे मोदी आता निवडणुकाच्या तोंडावर पवार साहेबांवर टीका करत आहेत पण राज्यातील जनतेला सत्यस्थिती माहित आहे. आमचा नेता हिटविकेट होणारा नाही तर क्लीनबोल्ड करणारा आहे असा टोला त्यांनी मोदींना लगावला. तसेच मोदींनी सभा घेऊन काहीही फरक पडणार नसून गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा येथे भाजपचा पराभव करून महाआघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.गेल्या काही दिवसांपासून बेताल वक्तव्ये करणा-या चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेताना मलिक म्हणाले की, भाजीवाल्यांच्या मागे गजरे घेवून फिरणारे मंत्री चंपा (चंद्रकांत पाटील) यांनी चंपेगिरी सोडावी,त्यांच्यात हिम्मत असेल तर अजितदादा पवार यांची चौकशी करुन दाखवावी. तुम्हाला कुणी अडवले आहे, नाही तर जनताच तुमची चंपी करेल असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना