शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

विश्वासघातकी पवारांच्या पालख्या किती काळ उचलणार : मुख्यमंत्र्यांचा हर्षवर्धन पाटील यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 12:40 PM

शरद पवार यांनी १९९१ पासून विश्वासघाताचे राजकारण केले. स्व: शंकरराव पाटील यांनाही लोकसभेला कामाला लागा असे सांगून अचानक पुतण्याला उमेदवारी होती.

ठळक मुद्दे निर्णय तुम्ही घ्यायचा आहे 

कळस : शरद पवार यांनी १९९१ पासून विश्वासघाताचे राजकारण केले. स्व: शंकरराव पाटील यांनाही लोकसभेला कामाला लागा असे सांगून अचानक पुतण्याला उमेदवारी होती. त्यामुळे  तुम्ही कितीही काम करा.  तुम्हाला ही मंडळी चित केल्याशिवाय राहणार नाही. किती पालख्या उचलायच्या ते तुम्ही ठरवा. तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. मात्र मित्र होता म्हणून सांगतो तुमचा वाली कोण आहे ते तुम्ही ठरवा असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना केला. इंदापूर येथे महायुतीच्या उमेदवार  कांचन कुल यांच्या प्रचारार्थ सांगता सभेत ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, . पक्षाच्या प्रमुखाला हवेची दिशा समजली त्यामुळे माढा मतदारसंघातून पळ काढावा लागला. त्यामुळे यांचे तर काय होईल? पंतप्रधान मोदीनी बेटी बचाओ असा नारा दिला. मात्र याचे अनुकरण पवार बेटी बचाओ असे सांगून करत आहेत . घरात घुसून मारण्याची भाषा यांच्याकडून केली जात आहे ही अनुकरणीय नाही. ते म्हणाले, मुळशी धरणाचा पाण्याचा प्रश्न सोडवुन या भागातील बावीस गावाना पाणी दिले जाईल. डबघाईला आलेल्या कारखान्यांना मदत केली. मात्र भीमा पाटस साखर कारखान्याला केवळ राजकीय हेतूने पुणे जिल्हा बँकेने मदत केली नाही. त्यामुळे राज्यशासन कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे.  केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले  म्हणाले,  याठिकाणी आम्ही घुसुन मारु असे सांगतात मात्र आम्ही घुसुन तर दिले पाहिजे.  पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले,  मागील निवडणुकीचा वचपा काढा. धनगर समाजाचे नुकसान  पवारांनी केले.  मात्र धनगर समाजाला सवलती देण्याचे काम या सरकारने केले.जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले, सत्तेतून पैसा व पैसातुन सत्ता धोरण विरोधकांनी राबीवले अनेकांची घर फोडण्याचे काम यांनी केले. यांना चारी मुंडी चित केले जाईल.  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या,  राष्ट्रवादी काँग्रेसकडुन जातीपातीचे राजकारण केले जात आहे. सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचे काम केले. मात्र आता हे चालणार नाही. कांचन कुल म्हणाल्या, याठिकाणी विरोधकांची हुकुमशाही चालु आहे. आत्ता फोन करायला सुरूवात झाली आहे. या वेळी  दौंडचे आमदार राहुल कुल, उत्तम जानकर, मिथुन आटोळे यांची भाषणे झाली  पृथ्वीराज जाचक, सुनिल पोटे, राजेंद्र काळे, मारुती वणवे, भजनदास पवार, माऊली चवरे, दादासाहेब केसकर, नानासाहेब शेंडे, उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण