पाच वर्षांपूर्वी, म्हणजेच ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका अनेक अर्थांनी वेगळ्या ठरल्या होत्या. देशाच्या राजकारणात सर्वाधिक काळ - तब्बल २५ वर्षं टिकलेली मैत्री - अर्थात भाजपा-शिवसेना युती या निवडणुकीआधी तुटली होती. त्यामुळे सर्व मोठ्या निवडणुका एकत्र लढवणारे दोन मित्र वेगळे लढले होते. त्याचवेळी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही आघाडीची घडी बसू शकली नव्हती. त्यामुळे त्यांनीही स्वबळावर निवडणूक लढवली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट उसळल्यानं त्याचा फायदा भाजपाला झाला होता आणि चौथ्या क्रमांकावरून त्यांनी अव्वल स्थानी झेप घेतली होती.
असं होतं पक्षीय बलाबल
भाजपा - १२२ शिवसेना - ६३काँग्रेस - ४२राष्ट्रवादी काँग्रेस -४१अपक्ष - ७एमआयएम - २बहुजन विकास आघाडी - ३शेकाप - ३मनसे - १सपा - १ राष्ट्रीय समाज पक्ष - १ भारिप बहुजन महासंघ - १ माकप - १
मुंबई (एकूण जागा - ३६)
भाजपा - १५शिवसेना - १४काँग्रेस - ५एमआयएम,सपा - १
ठाणे-कोकण (एकूण जागा - ३८)
भाजपा - ७ शिवसेना - १५राष्ट्रवादी - ८काँग्रेस - १शेकाप - २बविआ - ३सपा, अपक्ष - प्रत्येकी १
पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा - ७०)
भाजपा - २४शिवसेना - १३काँग्रेस - १०राष्ट्रवादी - १९शेकाप, अपक्ष, मनसे, रासप - प्रत्येकी १
उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा - ३५)
भाजपा - १३शिवसेना - ७काँग्रेस - ७राष्ट्रवादी - ६माकप, अपक्ष - प्रत्येकी १
मराठवाडा (एकूण जागा - ४६)
भाजपा - १५शिवसेना - ११काँग्रेस - ९राष्ट्रवादी - ८एमआयएम - १अपक्ष - २
विदर्भ (एकूण जागा - ६३)
भाजपा - ४५शिवसेना - ३काँग्रेस - १०राष्ट्रवादी, भारिप - प्रत्येकी १अपक्ष - २