शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती जागा देणार? बावनकुळेंनी मांडले शक्तीचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 3:57 PM

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचेही उदाहरण दिले आहे. लोकमतला बावनकुळेंनी प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होणार आहे, असेही सांगितले. 

शिंदेंच्या शिवसेनेला विधानसभा, लोकसभेला जागा वाटपावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केले होते. याला बावनकुळेंनी काही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. तसेच जागावाटपावेळी काय केले जाणार आहे, त्यापूर्वी कोणती तयारी केली जात आहे, हे स्पष्ट केले आहे. 

चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासाठी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचेही उदाहरण दिले आहे. लोकमतला बावनकुळेंनी प्रदीर्घ मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होणार आहे, असेही सांगितले. 

जागावाटपाबाबत खुलासा करताना बावनकुळे म्हणाले की, शिंदेंकडे ५० आमदार आहेत. भाजपाकडे १०५ आहेत काही अपक्ष आहेत. आपल्याला संपूर्ण शेअर करावे लागेल. २४०-५०-६०-७० असे जेवढी ताकद आपली वाढविता येईल तेवढी वाढवावी लागेल, असे मी प्रवक्ता बैठकीत म्हणालो होतो. हे कोणाकरता कामाला येणार, जेवढी भाजपा मेहनत करेल, उद्या १०० जागा किंवा १२० जागा आल्या व शिंदेंना सव्वाशे, दीडशे गेल्या तर भाजपा विचार करतेय की  जेवढी भाजपाच्या उमेदवारांना ताकद लागेल, तेवढी क्षमता ताकद उद्या शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभेला आम्ही देणार आहोत. एकनाथ शिंदेंची जिथे ताकद आहे आणि उमेदवार भाजपाचा असेल तर त्यांनी त्यांची तयारी करू नये का, त्यांची टीम तयार करू नयेत का, अशी भूमिका मी मांडल्याचे बावनकुळे म्हणाले. 

उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र होतो, तेव्हा आम्ही काय करायचो. तेव्हा २८८ ची तयारी करायचो. २५ युती चालविली. कधी जागा कमीजास्त झाल्या. परंतू आम्ही पूर्ण महाराष्ट्राची तयारी करायचो. शेवटी एकच निवडणुक लढवायची आहे का, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे. यामुळे आम्ही शिंदेंसाठी आणि भाजपासाठी तयारी करत आहोत. आमची ताकद आम्ही वाढवतोय. शिंदेंच्या उमेदवारासाठी भाजपाची पूर्ण शक्ती लावणार आहोत, असेही बावनकुळेंनी सांगितले. 

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच...हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. देवेंद्र फडणवीस आणि ते एकत्र बसून निर्णय करतील. गरजही आहे. एका मंत्र्याकडे दोन दोन तीन तीन जिल्हे आहेत. यामुळे मला असे वाटते मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा