मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला किती जागा मिळणार याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केल्यामुळे राजकीय नेत्यांसह विश्लेषकही संभ्रमात आहेत.
२०१४च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला ४८ पैकी ४२ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस आघाडीला ६ जागा मिळाल्या होत्या. यावेळी महायुतीच्या जागांमध्ये घट होण्याची शक्यता बहुतेक एक्झिट पोलने वर्तविली आहे. तर न्यूज १८- आयडीएसओएसच्या अंदाजानुसार काँग्रेसला केवळ एक जागा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. टाइम्स नाऊ-व्हीएमआरच्या एक्झिट पोलनुसार भाजप-शिवसेना युतीला ३७ तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसने प्रत्येकी २२ जागा लढविल्या. राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातून हातकणंगले आणि अमरावती तर काँग्रेसने सांगली आणि पालघर या जागा आघाडीतील घटक पक्षांना दिल्या. सांगली आणि हातकणंगले या दोन जागांवर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उभे होते. अमरावतीची जागा नवनीत राणा यांनी लढविली तर पालघरची जागा बहुजन विकास आघाडीने लढविली. मागच्या निवडणुकीत राजू शेट्टी हे हातकणंगले येथून विजयी झाले होते. यावेळीची त्यांच्या विजयाची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, सांगलीत काय होणार, याबाबत उत्सुकता आहे. येथून स्व.वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील स्वाभिमानीकडून उभे होते.
अशोक चव्हाण (नांदेड), सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), माणिकराव ठाकरे (यवतमाळ), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई) आणि प्रिया दत्त (उत्तर मध्य) या जागा तर हमखास निवडून येतील असा दावा काँग्रेस नेते करत आहेत.एक्झिट पोलचा अंदाज आम्हाला मान्य नाही. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला किमान २४ ते २५ जागा मिळतील.-अशोक चव्हाण,प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसजनमत चाचण्यांचा अंदाज म्हणजे अंतिम निकाल नाही. २३ मे रोजी निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल, मात्र भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार येईल.-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्रीअंदाज अपना-अपनाएबीपी-नेल्सन : भाजप १७, शिवसेना १७, काँग्रेस ४, राष्ट्रवादी ९ आणि इतरांना १ जागा मिळतीलटीव्ही-९ सीव्होटर्स : भाजप १९, शिवसेना १५,काँग्रेस ८, राष्ट्रवादी ६ जागा मिळतीलन्यूज १८- आयडीएसओएस : भाजप २१ ते २३, शिवसेना २० ते २२, काँग्रेस १, राष्ट्रवादीला ४-६ व इतरांना ३-५ जागांची शक्यताइंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया : शिवसेना-भाजपला ३८-४२ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ६-१० जागा मिळतीलरिपब्लिक जन की बात : युतीला ३४ ते ३९ तर आघाडीला ८ ते १२ जागा मिळण्याचा अंदाज आहेन्यूज २४-टुडे्ज चाणक्य : शिवसेना-भाजपला ३८ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला १० जागा मिळतीलरिपब्लिक सी व्होटर्स : शिवसेना-भाजपला ३४ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला १४ जागा मिळतीलएनडीटीव्हीचा पोल आॅफ पोल्स : महायुतीला ३५ तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला १२ आणि इतरांना १ जागा मिळेल