मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला? - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:47 AM2018-05-11T04:47:57+5:302018-05-11T04:47:57+5:30
नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या ४ वर्षांत मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी दिले.
सोलापूर - नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या ४ वर्षांत मोदी सरकारने किती तरुणांना रोजगार दिला ते जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी दिले.
सोलापूर दौ-यावर आलेल्या खा़ चव्हाण यांनी काँग्रेस भवनात पत्रकारांशी संवाद साधला. दिल्ली येथील क ाँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार देणे, उत्पादित शेतमालाला हमीभाव, नैसर्गिक आपत्तीत दगावलेल्या शेतकºयांना आर्थिक मदत आणि सरसकट कर्जमाफीचा ठराव केल्याचे चव्हाण म्हणाले. निवडणूक काळात दिलेले एकही आश्वासन मोदींनी पाळले नाही़ देशातील बेरोजगारी वाढली आहे़
पालघर निवडणुकीच्या संदर्भात ते म्हणाले, सत्ता-संपत्तीच्या बळावर भाजपा सरकार तोडफोडीचे राजकारण करीत आहे़ भाजपा नेत्यांना त्यांच्याच पक्षातील दिवंगत नेत्यांबद्दल आस्था नाही़ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, दिवंगत वनगा यांच्याऐवजी सावरा असा उल्लेख करतात़ जीवंत आणि मृत व्यक्तीबाबत तारतम्याने बोलायचे असते हे त्यांना माहिती नाही.
उद्धव यांची भूमिका दुटप्पी
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व विषयांना मंजुरी द्यायची आणि बाहेर आल्यावर त्याच विषयांना विरोध दाखवायचा, असा क ार्यक्रम सेनेने सुरू केला आहे़ समृद्धी महामार्ग असो की नाणार प्रकल्प दोन्हींबाबत खुद्द उद्धव ठाकरे यांचीही भूमिका दुटप्पी असल्याचे स्पष्ट झाले आहे़ त्यामुळे सेनेने जनतेचा विश्वास गमावला आहे़ सध्याच्या परिस्थितीला भाजपाबरोबर सेनाही तितकीच जबाबदार असल्याचे चव्हाण म्हणाले.