- संजय घावरे
नामांकित गायकाची सुरेल मैफल, कवितांचा, गाण्यांचा कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, स्थानिक कलाकारांकडून कलाप्रदर्शन अशा नानाविध कार्यक्रमांनी दिवाळी पहाट सजलेली असते. मात्र, यामागे ठोस अर्थकारण असतं. काही न टाळता येणारे खर्च असतात. रसिक म्हणून हे अर्थकारण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.....
यंदा दिवाळी पहाटसोबत दिवाळी संध्यांचेही खूप कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लालबागला गणेश गल्लीतील गणपतीच्या मैदानात, दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, बांद्र्यातील रंगशारदा, गिरगावातील साहित्य संघ, नागरी निवारा, कन्नमवार नगर, गोरेगाव जिमखाना पटांगण, राजा बड़े चौक, अंधेरी, दहिसर, ठाणे, पनवेल ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. दिवाळी' पहाटचे विषय विभाग आणि रसिकांच्या आवडीनुसार ठरतात. लालबागच्या कार्यक्रमात उडत्या चालीवरची गाणी. तर साहित्य संघमध्ये संकर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशींच्या कवितांसारखा कार्यक्रम होतो. काही ठिकाणी भावगीत-भक्तिगीतांचा कार्यक्रम असतो, तर काही