नागपूर : बँकांतील बचत खात्यामध्ये किमान रक्कम जमा नसल्यास जास्तीतजास्त किती दंड आकारावा? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी रिझर्व्ह बँकेला केली व यावर तीन महिन्यांत भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश दिला.सामाजिक कार्यकर्ते डॉ. अंजनकुमार चॅटर्जी यांनी याचिका दाखल केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार त्यांच्याकडील बचत खात्यामध्ये महानगरांतील ग्राहकांना ३०००, शहरातील ग्राहकांना २००० तर, ग्रामीण भागातील ग्राहकांना १००० रुपये किमान जमा ठेवणे आवश्यक आहे. ही किमान रक्कम जमा न ठेवल्यास ५० रुपये महिन्याप्रमाणे दंड आकारला जातो. इतर बँकांच्या तुलनेत हा दंड खूपच जास्त आहे. अशा दंडातून ही बँक दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कमाई करते. ही वसुली अवैध आहे. त्यामुळे बँकेवर कायद्यानुसार कारवाई करावी, असे चॅटर्जी यांचे म्हणणे आहे. स्टेट बँकेने यावर बाजू स्पष्ट करताना याचिकेतील मुद्यांमध्ये काहीच नवीन नसून या विषयावर आधीच बँकेच्या बाजूने न्यायनिवाडे झाल्याची माहिती न्यायालयाला दिली.
बँक खात्यात किमान रक्कम नसल्यास किती दंड होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:17 IST