उच्च न्यायालयाची महापालिकेला विचारणामुंबई : बेघरांसाठी रात्रनिवारा बांधण्याकरिता किती जागा आवश्यक आहे? आणि असे लोक ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत, त्या ठिकाणांची माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई महापालिकेला दिले.मुंबई महापालिकेला वरील सर्व माहिती पुढील आठवड्यात खंडपीठापुढे सादर करावी लागणार आहे. रात्रनिवारा बांधण्यासाठी किती जागा आवश्यक आहे, याची माहिती महापालिकेने दिल्यावर, उच्च न्यायालय राज्य सरकारला तेवढी जागा महापालिकेला देण्याचे आदेश देईल. महापालिकेने सूचवलेल्या सर्व जागा अपुऱ्या असल्याने सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आल्याची माहिती राज्य सरकाने खंडपीठाला दिली होती. वरील निर्देश ‘होमलेस कलेक्टिव’ या एनजीओने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठाने दिले. याचिकेनुसार, मुंबईमध्ये रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी मुंबईत २०७ रात्रनिवाऱ्यांची आवश्यकता असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
रात्रनिवाऱ्यासाठी किती जागा आवश्यक?
By admin | Published: November 24, 2015 2:30 AM