अकोला : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लागू लॉकडाऊनचे नियम ‘अनलॉक - ५’ अंतर्गत शिथिल होत असताना आगामी सणासुदिचा काळात प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने हावडा ते मुंबई व हावडा ते अहमदाबाद या दोन विशेष गाड्या ६ आॅक्टोबरपासून दररोज चालविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या या रेल्वे जोडी आता दररोज धावणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे. या गाड्यांची वेळ व थांबे तेच राहणार आहेत.गाडी क्रमांक ०२८१० अप हावडा- मुंबई मेल ही विशेष गाडी ६ आॅक्टोबरपासून दररोज हावडा स्टेशनवरून प्रस्थान करेल. दुसºया दिवशी सायंकाळी ६.०८ वाजता अकोला स्थानकावर येईल व ६.१८ वाजता मुंबईकडे प्रयाण करेल.गाडी क्रमांक ०२८०९ डाऊन मुंबई- हावडा मेल ही विशेष गाडी ८ आॅक्टोबरपासून दररोज मुंबई येथून प्रस्थान करेल. दुसºया दिवशी सकाळी ६.०५ वाजता अकोला स्थानकावर येऊन हावडाकडे प्रयाण करेल.गाडी क्रमांक ०२८३४ अप हावडा- अहमदाबाद ही विशेष गाडी ७ आॅक्टोबरपासून दररोज हावडा येथून प्रस्थान करेल. ही गाडी दुसºया दिवशी सकाळी आपल्या नियोजित वेळेवर अकोला स्थानकावर येऊन मुंबईकडे प्रयाण करेल.गाडी क्रमांक ०२८३३ डाऊन अहमदाबाद - हावडा ही विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज मुंबई येथून प्रस्थान करेल. दुसºया दिवशी तिच्या नियोजित वेळेवर अकोला स्थानकावर येऊन हावडाकडे प्रयाण करेल. या चार जोडी गाड्यांना अकोला, मुर्तीजापूर, शेगाव, मलकापूर आदी स्थानकांवर थांबा राहणार आहे.