पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या इयत्ता बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. व्हॉट्सअॅपवरून प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी प्रत्येक वर्गातील प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर उशिरा येणाºया कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, त्यामुळे वेळेच्या अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी वर्गात हजर राहावे, असेआवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.प्रश्नपत्रिका ज्या वेळी मंडळाकडून केंद्रप्रमुखांकडे हस्तांतरित केल्या जातात, त्या दरम्यानच्या १५ ते २० मिनिटांच्या कालावधीत काही ठिकाणी पेपर फुटल्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे मंडळाने यंदा प्रत्येकी २५ प्रश्नपत्रिकांची सीलबंद पाकिटे तयार करून ती विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीनेच उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपवरून प्रश्नपत्रिका फोडण्यात सहभागी असलेले विद्यार्थी परीक्षा देण्यास उशिरा आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश न देण्याचा निर्णय समितीकडून घेण्यात आला आहे. राज्यातील केंद्रांवर मोबाइल जॅमर बसवावेत, असा प्रस्ताव मागील वर्षी विचाराधीन होता. त्याबाबत यंदा निर्णय झालेला नाही.राज्य मंडळाकडून यंदा काही व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्याची विद्यार्थ्यांना मुभा दिली होती. मात्र केवळ १५८ विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षणाचे विषय परीक्षेसाठी निवडले आहेत.१४ लाखांवर परीक्षार्थीबारावी परीक्षेला राज्याच्या ९ विभागांमधून १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी बसले आहेत. राज्यभरातील २ हजार ८२२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, त्यासाठी ९ हजार ४८६ कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.‘कॉपी’साठी २५२ पथकेकॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून प्रत्येक जिल्ह्यासाठी ७ याप्रमाणे २५२ भरारी पथके नेमली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
आजपासून बारावीची परीक्षा, राज्यातून १५ लाख विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:14 AM