शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

दहापैकी १ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये! बारावीच्या निकालात पुन्हा मुलींचीच बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 6:14 AM

९१.२५% लागला राज्याचा निकाल; गतवर्षीच्या तुलनेत घट कोकण विभाग अव्वल, विज्ञान शाखा सरस

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी लागला असून १० पैकी एका विद्यार्थ्याने डिस्टिंक्शन मिळवल्याचे निकालातून दिसून आले आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.२५ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाचा टक्का २.९७ टक्के घसरला आहे. 

विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे याहीवर्षी मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ४.५९ टक्के अधिक आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी दिली. यावेळी सचिव अनुराधा ओक यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

निकालामध्ये कोकण विभाग टॉपवर आहे. मुंबईने निकालात तळ गाठला आहे. यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९६ टक्के, तर इतर शाखांचा निकाल कमी लागला आहे. त्यात कला शाखा ८४.०५, वाणिज्य ९०.४२, व्यवसाय अभ्यासक्रम ८९.२५ टक्के आहे.     

ओव्हर रायटिंग वगळून विद्यार्थ्यांना मिळणार गुणऔरंगाबाद विभागीय मंडळात भाैतिकशास्त्राच्या ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये ओव्हर रायटिंग झाल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. ओव्हर रायटिंगचा मजकूर वगळता सर्वांना गुण दिले आहेत, तसेच त्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासह इंग्रजी विषयात चुकीचा प्रश्न नाेंदवून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्वांना गुण दिले असल्याचेही ते म्हणाले.

विभागनिहाय निकाल     विद्यार्थी    उत्तीर्ण     टक्केवारीकोकण    २६,१२३    २४,९९०    ९६.०१ पुणे    २,४२,७३४    २,२४,६६५    ९३.३४ कोल्हापूर    १,१८,७९१    १,१०,११०    ९३.२८ अमरावती    १,३९,७६९    १,२८,५२१    ९२.७५ औरंगाबाद    १,६६,५५१    १,५१,१४८    ९१.८५ नाशिक    १,५९,९८७    १,४५,७४९    ९१.६६ लातूर    ८९,७८२    ७९,५७२    ९०.३७नागपूर    १,५३,२९६    १,३७,४५५    ९०.३५ मुंबई    ३,३१,१६१    २,९०,२५८    ८८.१३ 

मुलींचाच डंका 

n राज्यात ७ लाख ६७ हजार ३८६ मुलांनी बारावीची परीक्षा दिली. n त्यापैकी ६ लाख ८४ हजार ११८ उत्तीर्ण झाले, तर ६ लाख ४८ हजार ९८५ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ६ लाख ८ हजार ३५० मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

पुनर्परीक्षेत काय झाले?राज्यात ३५,५८३ पुनर्परीक्षार्थींनी परीक्षा दिली हाेती. त्यातील १५,७७५ उत्तीर्ण झाले. 

साडेपाच हजार दिव्यांगांचे यश९ विभागांतील विविध शाखांमधून ६ हजार ७२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यापैकी ५,६७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल