शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

भाजीपाल्याचा मुंबईत प्रचंड तुटवडा

By admin | Published: June 03, 2017 4:03 AM

शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई बाजार समितीमधील आवक प्रचंड घटली आहे. भाजी मार्केटमध्ये फक्त १४७ वाहनांची आवक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई/मुंबई : शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबई बाजार समितीमधील आवक प्रचंड घटली आहे. भाजी मार्केटमध्ये फक्त १४७ वाहनांची आवक झाली. कांद्याची एकही गाडी आलेली नाही. आवक कमी झाल्याने बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. कोथिंबिरीची छोटी जुडी ५० व मोठी १०० रुपयांना विकली जात होती. इतर भाजीपाल्याचे दरही दुप्पट झाले असून, संप असाच राहिला तर सर्वच भाज्यांचे दर शंभरी पार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गुरुवारी ४९४ ट्रक, टेम्पो व इतर वाहनांची आवक झाली होती. परंतु शुक्रवारी राज्यातील शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी पाठवला नसल्याने दिवसभर फक्त १४७ वाहनांचीच आवक झाली. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश व दिल्लीमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. राज्यातून फक्त १० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. आवक प्रचंड घटल्याने होलसेल मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर झटक्यात दुप्पट झाले. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटोचे दर प्रतिकिलो ५ ते १२ रुपयांवरून १४ ते ३० रुपयांवर गेले आहेत. भेंडी १० ते १८ रुपयांवरून १४ ते ३२ रुपये, कोबी ८ ते १० रुपयांवरून २० ते २५ रुपये किलो दराने विकली जात होती. मार्केटमध्ये रोज ५००हून अधिक गाड्यांतील भाजीपाला खाली केला जातो. मात्र शुक्रवारी १२५ गाड्याही खाली झाल्या नाहीत. रात्रीपर्यंत संपावर तोडगा निघाला नाही, तर शनिवारी बाजारात भीषण परिस्थिती निर्माण होईल.- किरण झोडगे,अध्यक्ष, भायखळा मार्केटको-आॅप. प्रिमायसेस सोसायटीपालेभाज्या नको ग बाई..!कोथिंबीर, मेथी, पालक अशा नाशवंत पालेभाज्यांना अधिक मागणी असल्याने त्यांचे दरही तिपटीने वाढले होते. गुरुवारी २० ते ३० रुपयांना विकली जाणारी कोथिंबिरीची जुडी शुक्रवारी भायखळा, दादर येथील बाजारांत १२० ते १५० रुपयांना विकली जात होती. मेथी आणि पालक तर बाजारात पाहायलाच मिळाली नाही. याउलट गवारी, भेंडी, दुधी, वांगी या भाज्यांचे दर दीड ते दोन पटीने वाढवून सांगण्यात येत होते.एपीएमसी काही वेळ बंद माथाडी नेते आमदार शशिकांत शिंदे यांना कोरेगावमध्ये आंदोलन करताना अटक करण्यात आली. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबई बाजार समितीमधील कांदा-बटाटा, धान्य व मसाला मार्केट दुपारनंतर बंद ठेवण्याचे आवाहन केले. यामुळे मार्केटमधील बहुतांश व्यवहार थांबले होते.मुंबई बाजार समिती व किरकोळ मार्केटमधील बाजारभाव (प्रति किलो)वस्तू३१ मे२ जूनकिरकोळफरसबी३० ते ५०६० ते ७०८० ते १००टोमॅटो५ ते १२१४ ते ३०४० ते ६०तोंडली८ ते २२८ ते २४४० ते ६०भेंडी१० ते १८१४ ते ३२६० ते ८०कोबी८ ते १०२० ते २४५० ते ६०फ्लॉवर८ ते १०१८ ते २२६० ते ७०कारली२२ ते २४१८ ते २२४० ते ६०वाटाणा३४ ते ३७३४ ते ३७५० ते ६०शेवगा शेंग२० ते २४२४ ते २६४० ते ६०