सातारा : प्रवाशांना नातेवाइकांसमवेत दिवाळी साजरी करता यावी म्हणून एसटी महामंडळाने जादा गाड्या सोडल्या... चालक-वाहकांच्या रजा, सुट्या रद्द केल्या आहेत. मुक्कामासाठी साताऱ्यात आलेल्या चालकांना आपण कुटुंबीयांपासून दूर असल्याची भावना निर्माण होऊ नये म्हणून एसटीच्या सातारा आगारातील कर्मचाऱ्यांनी दीडशे चालक-वाहकांसाठी अभ्यंगस्नानाचे आयोजन केले आहे.‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ नवीन कपडे घालून कुटुबीयांंसमवेत दिवाळी साजरी करावी, गोड-धोड खावेत, असा प्रत्यकाचे नियोजन असते; पण काहींना हे शक्य होत नाही. दिवाळीचा सण हा राज्य परिवहन महामंडळासाठी हा गर्दीचा हंगाम असतो. या दिवसात प्रवाशांची गर्दी कित्येकपटीने वाढलेली असते. दिवाळीत चालक-वाहकांच्या सुट्या रद्द केल्या जातात. चालक-वाहक कर्तव्य म्हणून भलेही कामावर जात असतील; पण आपण कुटुंबीयांपासून दूर असल्याची भावना त्यांच्यात असते. म्हणून सातारा आगारातर्फे अनेक वर्षांपासून अभ्यंगस्नानाचे आयोजन केले जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या एकूण सातारा आगारात केवळ सातारा आगारातर्फेच या उपक्रमाचे आयोजन केले जाते. आगारातील कर्मचारी लोकवर्गणीतून साहित्य आणून हा उपक्रम राबवितात. सातारा आगारातील कर्मचारी पाहुण्या कर्मचाऱ्यांना डोक्याला तेल, साबण लावून अंघोळ घालतात. परगावी जाण्यासाठी भल्या पहाटे बसस्थानकात आलेल्या प्रवाशांसाठीही हा उपक्रम पाहिल्यानंतर कौतुक वाटते. या प्रवाशांच्या ऐकीमुळेच एसटी खऱ्या अर्थाने टिकली असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)गरम पाणी, तेल, उटणे अन् फराळहीसोमवारी रात्री सातारा आगारात मुक्कामाची गाडी घेऊन येणाऱ्या चालक-वाहकांसाठी मंगळवारी अभ्यंगस्नान घातले जाणार आहे. अंघोळीसाठी गरम पाणी, तेल, उटणे, साबण दिली जाते. सातारा आगारातील कर्मचारीच अंघोळ घालतात. त्यानंतर खाण्यास फराळ दिला जातो. महामंडळाच्या खर्चात तरतूद नसली तरी आगारातील कर्मचारीच खिशातून पैसा काढून हा उपक्रम राबवत आहेत. अनेक वर्षांची ही परंपरा यंदाही सुरू राहणार आहे, अशी माहिती वरिष्ठ आगार व्यवस्थापक नीलम गिरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दीडशे चालक-वाहकांचे उद्या होणार अभ्यंगस्नान!
By admin | Published: November 08, 2015 10:50 PM