शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

नोकरीच्या शेकडो तरुणांची करोडोंची फसवणूक: आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास

By admin | Published: August 24, 2016 9:37 PM

नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कायमस्वरुपी नोकरीला लावून प्रशिक्षणाच्या नावाखाली ठाण्यासह देशभरातील सुमारे तीन हजार सॉफ्टवेअर अभियंत्यांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा लवकरच

ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 24 : नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कायमस्वरुपी नोकरीला लावून प्रशिक्षणाच्या नावाखाली ठाण्यासह देशभरातील सुमारे तीन हजार सॉफ्टवेअर अभियंत्यांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती सूत्रंनी दिली. यातील फरारी संचालकांचा शोध घेण्यात येत असून ते परदेशात पसार होण्याची शक्यता गृहीत धरुन देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ह्यलूक आऊट नोटीसह्ण बजावण्यात येणार आहे.

कामगारांना एक आठवडयाची सुटी देऊन त्यांना गाफील ठेवून या कंपनीचे यश सिंग, छाया सिंग आणि पंकजकुमार हे तिघे संचालक अचानक पसार झाले. ते परदेशात पसार होऊ नये म्हणून ही लूक आऊट नोटीस बजावण्याची प्रक्रीया सुरु केल्याची माहिती सूत्रंनी दिली. नामांकित संकेतस्थळावर ट्रेनी यातील अनेकांना ह्यसॉफ्टवेअर डेव्हलपर ट्रेनीह्ण या पदासाठी निवड झाल्याचे पत्र देऊन नंतर त्यांच्याकडून प्रत्येकी 25 हजार रुपये उकळण्यात आले. तर काहींना प्रशिक्षण भत्यापोटी सहा हजार रुपये देण्याचेही सांगण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्षभराने 25 हजारांची रक्कम परत करण्यात येणार होती

परंतू, नोकरीही मिळाली नाही आणि पैसेही परत न करता कंपनीच्या संचालकांनी अचानक पलायन केल्याने याप्रकरणी ठाण्यातील सुमारे 6क्क् तरुणांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात 23 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली आहे. ठाण्यातील 600 तरुणांची दीड कोटींच्या सुमारास तर देशभरातील सुमारे अडीच ते तीन हजार तरुणांची सहा ते सात कोटींची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे. या गुन्हयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे तो तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव वागळे इस्टेट पोलिसांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे तो लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी सांगितले.