राज्यातील २० हजारांपेक्षा जास्त कुंभार कुटुंबावर उपासमारीची वेळ, मातीच्या वस्तू विकण्यासाठी परवानगी द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 06:57 PM2020-04-18T18:57:32+5:302020-04-18T19:09:39+5:30

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना साकडे

hunger time on the More than 20,000 kumbhar families in the state; request for permission to sell soil Goods | राज्यातील २० हजारांपेक्षा जास्त कुंभार कुटुंबावर उपासमारीची वेळ, मातीच्या वस्तू विकण्यासाठी परवानगी द्या

राज्यातील २० हजारांपेक्षा जास्त कुंभार कुटुंबावर उपासमारीची वेळ, मातीच्या वस्तू विकण्यासाठी परवानगी द्या

googlenewsNext
ठळक मुद्देकारागिरांची उपासमार होण्याची व्यक्त केली भीती राज्यात ग्रामीण भागातील वीट उद्योग चालू करणेसाठी नुकतीच परवानगी

प्रशांत ननवरे
बारामती : राज्यात वीट व्यावसायिक सोडून गाडगी मडकी बनविणारे २० हजार एवढी कुंभार कुटुंबे आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लागणारे कुंभार माती कलश व उन्हाळी माट , डेरे,रांजण,सुरई विकण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.सणासुदीला लागणाच्या मातीच्या वस्तू तयार करून उदरनिर्वाह करतो. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विक्रीसाठी ग्रामीण कारागीरांवर उपासमार होण्याची भीती अखिल भारतीय प्रजापती कुंभकार महासंघाचे अध्यक्ष दत्ता कुंंभार यांनी व्यक्त केली. त्यासाठी कुंभार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पत्र पाठविले आहे. अध्यक्ष कुंभार यांनी व्यावसायिक अडचणीत आल्याचे सांगत विक्री परवानगीसाठी साकडे घातले आहे.
राज्यात ग्रामीण भागातील वीट उद्योग चालू करणेसाठी नुकतीच परवानगी मिळाली आहे. त्याबद्दल आम्ही कुंभार ऋणी आहे. राज्यातील कुंभार समाज आपला पारंपरिक वीट व्यवसाय तसेच पारंपरिक गाडगी, मडकी, माठ, रांजण, गणपती, व सणासुदीला लागणाच्या मातीच्या वस्तू तयार करून उदरनिर्वाह करतो.या कारागीरांनी उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पिण्यासाठी लागणारे उन्हाळी माठ,रांजण व इतर वस्तू आदी  लाखोच्या संख्येने बनवून ठेवले आहेत. या कुंभारकारागिरांना चार पैसे कमावण्याचा हा महत्त्वाचा सीझन असतो. त्यावरच त्यांचा वर्षभर कुटुंब चरितार्थ चालतो. अचानकपणे आलेल्या या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश आज बंद आहे. कुंभारानी बनविलेल्या लाखो वस्तूज्याची किंमत करोडो रुपये आहे. त्या रस्त्यावर बाहेर जावून विकता येत नसल्यामुळे घरात पडून आहेत. कुंभार लोक हे अतिशय छोट्या घरात राहतात.या वस्तू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे जागा सुध्दा नाही.अन्यथा ग्रामीणकारागीरांवर उपासमारीने मरण्याची वेळ येण्याची भीती  अखिल भारतीयप्रजापती कुंभकार महासंघाचे अध्यक्ष दत्ता कुंंभार यांनी व्यक्त केली.अक्षय तृतीयेला मातीचा कळस पूजन या सणानिमित्त घरो घरी होतअसते.कुंभारसमाजाने त्यासाठी लाखो मातीची भांडी बनविली आहेत.  ती संबधित माणसापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. तसेच कुंभार काम करणाºया व्यक्तीला त्यांनी बनविलेले हजारो उन्हाळी माठ, सुरया, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लागणारी कुंभारी भांडी रोडवर तशेच गलोगल्ली विकण्यासाठी परवानगी देण्यात यावी.प्रत्येक तालुक्यात ५० ते ६० कुटुंबांना रस्त्यावर फिरण्याची परवानगी द्यावी लागणार आहे. सदर मातीच्या वस्तू न विकता घरात पडून राहिल्यास कुंभार कारागिरावर उपाशीपोटी राहण्याची वेळ येण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
———————————

Web Title: hunger time on the More than 20,000 kumbhar families in the state; request for permission to sell soil Goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.