शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

श्रेयासाठी घाई, तरणतलाव बंदच

By admin | Published: January 20, 2017 12:51 AM

निवडणूक जवळ आल्याने श्रेय लाटण्याच्या उद्देशाने अर्धवट अवस्थेतील प्रकल्प असोत

पिंपरी : निवडणूक जवळ आल्याने श्रेय लाटण्याच्या उद्देशाने अर्धवट अवस्थेतील प्रकल्प असोत अथवा प्रकल्पाच्या केवळ जागा निश्चित झालेल्या असोत, भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ उरकण्याची घाई राजकीय नेत्यांनी केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी उद्घाटन झालेले दोन जलतरण तलाव अद्याप नागरिकांसाठी खुले केलेले नाहीत. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एकाच दिवशी विविध प्रकल्पांचे उद्घाटन समारंभ उरकण्यासाठी अक्षरश: मॅरेथॉन झाली. त्यानंतरही संबंधित नेत्यांचे शहरात दौरे सुरू आहेत. मग दोन आठवडे अगोदरच उद्घाटन उरकण्याचा उद्देश काय, असा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने अद्याप हे तलाव क्रीडा विभागाकडे हस्तांतरित केले नसल्याचे स्पष्टीकरण क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिले आहे.महापालिका हद्दीत सद्य:स्थितीत १२ जलतरण तलाव आहेत. आणखी दोन तलाव प्रस्तावित आहेत. जलतरण तलावांचे शहर असे पिंपरी-चिंचवडला संबोधले जाऊ लागले आहे. नागरिकांच्या हितापेक्षा आपल्या प्रभागात आपल्याला हवे तसे घडवून आणायचे असा काही नगरसेवकांचा अट्टहास असल्यामुळे जलतरण तलावांची संख्या वाढली आहे. जलतरण तलावाचे शुल्क नाममात्र आकारले जाते. जलतरण तलावाच्या देखभाल,दुरूस्तीचा खर्च तलावाच्या शुल्कातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत अधिक पटीने असतो. त्यामुळे महापालिकेला जलतरण तलाव सुविधा उपलब्ध करून देणे महागात पडते. मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करून तलावांची देशभाल, दुरूस्ती करणाऱ्या ठेकेदारांच्या हितासाठी तलावाच्या प्रकल्प उभारणीचा काही नगरसेवक आग्रह धरतात, हे निदर्शनास आले आहे. (प्रतिनिधी)>पालिकेचे नाही धोरण... जलतरण तलावाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम निकटवर्तीयाकडे सोपविण्याच्या उद्देशाने महापालिकेला तोट्याचे ठरणारे जलतरण तलाव सुरू ठेवण्याचा काहींचा आग्रह आहे. तो तलाव दुरूस्तीसाठी बंद असेल, तर पर्यायी व्यवस्था म्हणून जवळच्या दुसऱ्या तलावावर जायचे असते. परंतु काही महाशयांनी अगोदरच प्रभागातील सोसायट्यांमध्ये जाऊन पोहण्याच्या पासाचे अर्ज भरून घेतले आहेत. अशा मनमानी कारभार होऊ न देता महापालिकेने निश्चित धोरण अवलंबण्याची गरज आहे.>महापालिकेच्या स्थापत्य विभागाने जलतरण तलावांचे प्रकल्प उभारले. त्यानंतर या प्रकल्पांचे क्रीडा विभागाकडे रीतसर हस्तांतरण होणे गरजेचे असताना, ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे क्रीडा विभागाला नागरिकांसाठी तलाव खुले करता येत नाहीत. तलाव खुले करण्यास प्रशासकीय अडचणी आहेत. त्यामुळेच तलाव बंद ठेवण्यात आला असून, प्रशासकीय प्रक्रियेनंतर नागरिकांसाठी खुला करण्यात येईल.- योगेश कडूसकर, सहायक आयुक्त क्रीडा विभाग