ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 9 - गेल्या अनेक दिवसांपासून पत्नीचे असलेले विवाहबाह्य प्रेमसंबंध पतीच्या सतर्कतेमुळे उघड झाले आहेत. बिबवेवाडीत हा प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकर पत्नीशी प्रेमसंबंध ठेवण्यासाठी चक्क नाइटी परिधान करून घरात येत असे. त्यामुळे पतीलाही सुरुवातीला त्याच्यावर संशय आला नाही. मात्र एकदा पती निद्राधीन असताना या प्रियकरानं घरात इंट्री केली आणि त्याचा पर्दाफाश झाला. विशेष म्हणजे हा प्रियकर पत्नीच्या शेजारीच राहत असल्याची माहिती मिळाली आहे. प्रियकर छोटा व्यावसायिक आहे. त्याचे नाव राजेश मेहता असून, तो 44 वर्षांचा आहे. पतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पतीनं पोलिसांनी सांगितले की, मेहता माझ्या अनुपस्थितीत माझ्या घरात येत असल्याची माहिती मला वॉचमनकडून प्राप्त झाली आहे. त्यावेळीच मी माझी बायको आणि मेहताचे प्रेमसंबंध उघड करण्याचा निश्चय केला. गेल्या 7 वर्षांपासून मी शहराबाहेर असल्यानं तेव्हापासून यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत. मेहताला घरात येऊ नये म्हणून मी बजावलं होतं. मात्र तरीही तो घरात आला. मेहता दररोज गाऊन आणि दुपट्टा परिधान करून घरात प्रवेश करत असे.
दरम्यान, एकदा मी सकाळी लवकर उठून माझ्या बायकोसोबत व्यायामशाळेत गेलो होतो. व्यायामशाळेतून घरी आल्यानंतर नाश्ता करून मी थोडा आराम करण्याचा विचार केला. सकाळी 11च्या दरम्यान मी जेव्हा गार झोपेत होतो. त्यावेळी दुर्गंधीयुक्त वासानं मला जाग आली. त्यानंतर समोर असलेल्या त्या व्यक्तीला मी विचारलं तुम्ही कोण आहात, इथे कसे आलात, तुम्हाला काय पाहिजे, तर त्यानं मला मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं दुस-या बेडरुममध्ये जाऊन बेडरुम लॉक केला. मग मी माझ्या पत्नीला विचारलं तो कोण आहे, तुला माहीत असल्यास मला सांग. मात्र तिने ओळखत नसल्याचं म्हटलं. अचानक तो बाहेर आला आणि पळण्याचा प्रयत्न करू लागला. मी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यानं माझं टी-शर्ट फाडलं. जेव्हा मी त्याला निरखून पाहिलं तेव्हा तो मेहता असल्याचं समजलं. त्यानंतर मेहतानं मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
मात्र या प्रकारानंतर तक्रारदार पतीनं त्याच्या पुतण्याला बोलावलं आणि त्याला घेऊन जाण्यास सांगितलं. मात्र त्यावेळी तो ड्रग्ज घेत असून, नशेत असल्याचं आढळलं. मेहताविरोधात पोलिसांनी 425, 323, 504 कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. मेहताला कोर्टात हजर केले असता 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.