ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 19 - तीन महिन्यांच्या गर्भवती महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक भोसा येथे वंदे मातरम चौकातील मंगेशनगरातील ही घटना आहे. शितल मेश्राम असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून त्या परिचारिका होत्या.
शितलच्या पतीनंच तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. शितल पती गजेंद्र मेश्राम जिल्ह्यातील मारेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. गुरुवारी शीतलने गळफास लावून आत्महत्या केल्याचे त्याने सांगितले गेले. मात्र, प्रत्यक्षात तिच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर स्वरुपातील जखमा असल्याचे आढळून आले.
यावरुन गजेंद्रनंच शितलची हत्या करुन तिनं आत्महत्या केल्याचा देखावा करत असल्याचा आरोप शितलचे मामा माधव मडके यांनी केला आहे. तशी तक्रार त्यांनी पोलिसात केली आहे. मात्र, वडगाव रोड पोलिसांनी या प्रकरणात हत्येची तक्रार घेण्यास टाळटाळ केल्याचा आरोपही मडके यांनी केला आहे. तक्रार नोंदवून घेण्यासाठी तब्बल पाच तास लागले, असेही मडके यांनी सांगितले.
याप्रकरणी शितलच्या नातेवाईकांना याप्रकरणी वाघापूर रोड वरील शवविच्छेदनगृहासमोर आपला संताप व्यक्तक पोलिसांना धारेवर धरले. शितल ही मूळची वर्धा जिल्ह्याच्या वायफळ येथील रहिवासी होती. सप्टेंबर २०१५ मध्ये तिचा गजेंद्र सोबत विवाह झाला होता. शितलची नेमकी हत्या की आत्महत्या याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे.