शेणवा : हुंड्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिची हत्या केल्याप्रकरणी पती दिनेश गणपत बोंद्रे याला कल्याण न्यायालयाने सात वर्षांची कैद आणि ३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्यांतर्गत असणाऱ्या बोंद्रेपाडा गावातील दिनेश बोंद्रे याचा हिंगलुद येथील हरी जयराम घरत यांच्या मुलीशी विवाह झाला होता. जीप घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणावेत, यासाठी दिनेश हा पत्नीला मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ करीत होता. दिनेश यानेच आपल्या पत्नीचा गळा आवळून ठार मारल्याबद्दल तो व इतर पाच जणांविरोधात घरत यांनी किन्हवली पोलिसात तक्र ार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी डिसेंबर २००९ रोजी साक्षी पुराव्यानुसार न्यायालयाने दिनेश यास पत्नीचा छळ करणे व तिची हत्या करणे, या दोन्ही गुन्ह्याकरिता दोषी ठरवून वरील शिक्षा सुनावली. पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, उपविभागीय पोलीस अधिकारी व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील, पो. उपनिरीक्षक कोळी यांनी तपास केला होता.हत्येकरिता पतीला सात वर्षांची कैदशेणवा : हुंड्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिची हत्या केल्याप्रकरणी पती दिनेश गणपत बोंद्रे याला कल्याण न्यायालयाने सात वर्षांची कैद आणि ३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्यांतर्गत असणाऱ्या बोंद्रेपाडा गावातील दिनेश बोंद्रे याचा हिंगलुद येथील हरी जयराम घरत यांच्या मुलीशी विवाह झाला होता. जीप घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणावेत, यासाठी दिनेश हा पत्नीला मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ करीत होता. दिनेश यानेच आपल्या पत्नीचा गळा आवळून ठार मारल्याबद्दल तो व इतर पाच जणांविरोधात घरत यांनी किन्हवली पोलिसात तक्र ार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी डिसेंबर २००९ रोजी साक्षी पुराव्यानुसार न्यायालयाने दिनेश यास पत्नीचा छळ करणे व तिची हत्या करणे, या दोन्ही गुन्ह्याकरिता दोषी ठरवून वरील शिक्षा सुनावली. पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, उपविभागीय पोलीस अधिकारी व्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील, पो. उपनिरीक्षक कोळी यांनी तपास केला होता.
हत्येकरिता पतीला सात वर्षांची कैद
By admin | Published: December 26, 2015 12:36 AM