लातूर : शहराजवळच्या खोपेगाव येथे सौदागर गोरोबा पवार (३५) यांचा रविवारी पहाटे दगडाने ठेचून करण्यात आलेला खून पत्नीनेच घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पत्नी सत्यभामासह तिचा प्रियकर लखन उर्फ लक्ष्मण सुभाष जाधव (२३) यांना लातूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.खुनाच्या घटनेनंतर ग्रामीण पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेत कसून चौकशी केली. प्रथम सत्यभामाने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच आपणच हा खून घडवून आणल्याचे कबूल केले. अनैतिक संबंधास अडसर ठरल्याच्या कारणावरून गावातीलच आपला प्रियकर लखन याच्या हातून पतीचा काटा काढल्याचे तिने सांगितले. (प्रतिनिधी)>दोघांत सतत भांडणेसत्यभामाचे गावातील लखनशी गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याच कारणावरून तिचे पती सौदागरशी सातत्याने भांडत होत होती.
अनैतिक संबंधात अडथळा ठरल्याने पतीचा खून
By admin | Published: June 28, 2016 3:52 AM