शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

पतीचा खून, पत्नीला पाच वर्षे शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2017 5:26 PM

कोदे खुर्द (ता. गगनबावडा) येथे वानरमारी समाजातील वसंत कृष्णा निकम (वय ५०) यांचा गळा चिरून खून केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाले.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 31 - कोदे खुर्द (ता. गगनबावडा) येथे वानरमारी समाजातील वसंत कृष्णा निकम (वय ५०) यांचा गळा चिरून खून केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाले. या प्रकरणी त्यांची पत्नी वासंती (४२) हिला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व हजार रुपये दंडाची शिक्षा मंगळवारी सुनावली. आरोपी वासंती हिने, पती वसंत याचा, त्याने १४ वर्षांच्या स्वत:च्या मुलीवर वारंवार अतिप्रसंग केल्याच्या कृत्यातून खून केला होता. अधिक माहिती अशी, माजी सरपंच सहदेव कृष्णा कांबळे यांनी त्यांच्या मालकीच्या उगळाची मळी नावाच्या शेतात, वानरमारी समाजाच्या वसंत निकम यांना कुटुंबासह राहण्यासाठी जागा दिली होती. रानातील शिकार, वनौषधी विकून तसेच कांबळे यांच्या शेतात रोजगार करून ते उदरनिर्वाह करीत होते. वसंत व वासंती यांना सहा मुली व पाच मुले अशी एकूण अकरा मुले आहेत. थोरला मुलगा दीपक (२५) हा कोकणात नातेवाईकाचा खून केल्याने कारागृहात शिक्षा भोगत आहे. बबन (२४) हा रत्नागिरीमध्ये राहण्यास आहे. दोन मुलींची लग्ने झाली आहेत. त्यामुळे सात मुलांना घेऊन ते दोघे राहत होते. वसंत हा नेहमी दारू पिऊन येत असे. त्यावेळी तो १४ वर्षांच्या मुलीवर पत्नी व अन्य मुलांसमोरच जबरदस्तीने अतिप्रसंग करीत असे. याला वासंतीने विरोध केल्यास तो तिला मारहाण करीत असे. त्यामुळे निमूटपणे त्याचा हा त्रास ती सहन करीत होती.१७ आॅगस्ट २०१५ रोजी दोघा जणांनी कोल्हापूरला येऊन पाच हजार रुपयांच्या गाददळीच्या बियांची विक्री केली व परत घरी आले. यावेळी वसंत याने दारू पिऊन जेवण केले. त्यानंतर तो पुन्हा मुलीवर अतिप्रसंग करणार म्हणाला. यावेळी पत्नी वासंती व मुलगा संदीप यांनी त्याला विरोध केला असता त्याने तिच्यासह मुलाला मारहाण केली. मध्यरात्रीच्या सुमारास सुडाने पेटलेल्या वासंतीने त्याचा झोपेतच कोयत्याने गळा चिरून खून केला. त्यानंतर मुलांना सोबत घेऊन ती अंधारातून सुमारे सात किलोमीटर अंतर चालत माजी सरपंच कांबळे यांच्या घरी आली. यावेळी तिने तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघा चोरट्यांनी पतीला मारहाण केल्याचा बनाव केला. त्यानंतर कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता खून झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी खुनाचे गूढ उकलून वासंतीला अटक केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक एस. ए. जमादार यांनी गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सहाय्यक सरकारी वकील ए. एम. पिरजादे यांनी तेरा साक्षीदार तपासले. आरोपीचा मुलगा, मुलगी, फिर्यादी व अन्य साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने शिक्षा सुनावली. मुले कावरीबावरीआरोपी वासंतीची पाच मुले बालसुधारगृहात आहेत, तर दोन लहान मुले तिच्यासोबत कारागृहात आहेत. त्यांनाही काही दिवसांनी बालसुधारगृहात ठेवले जाणार आहे. बाप गेला, आई कारागृहात आहे. आईबापाविना पोरकी झालेली मुले आई दिसत नसल्याने न्यायालयात कावरीबावरी झाली होती. तिला सुनावणीसाठी न्यायालयात आणले होते. पोलिसांनी पुन्हा त्या मुलांना बालसुधारगृहात नेऊन सोडले.