शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: September 23, 2016 9:14 PM

सासरची मंडळी संपत्तीची वाटणी करून देत नसल्याच्या कारणावरून राहत्या घरी जाळून घेतलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला.

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 23 -  सासरची मंडळी संपत्तीची वाटणी करून देत नसल्याच्या कारणावरून राहत्या घरी जाळून घेतलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला. पत्नी मरण पावल्याचे समजताच तिच्या पतीनेही रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात घडली.सीमा दिनेश लोधी (रा. भोईवाडा, उदय कॉलनी) असे मरण पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर तिचा पती दिनेश लोधी (राजपूत) हा सध्या घाटीत उपचार घेत आहे. पोलिसांनी सांगितले की, सीमा आणि दिनेश यांचा दहा ते पंधरा वर्षांपूर्वी विवाह झाला. लग्नानंतर त्यांना तीन मुले झाली. सीमाचे माहेर भोईवाडा आहे तर सासर धुळे जिल्ह्यात आहे. सासरची मंडळी तिचा नेहमी छळ करीत असत. शिवाय घरातील संपत्तीची वाटणीही ते करून देत नव्हते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी राजपूत दाम्पत्य भोईवाडा येथे राहण्यास आले. दिनेश एका दुकानात कामाला लागला. दरम्यान १६ सप्टेंबर रोजी सासरची मंडळी संपत्तीची वाटणी करून देत नाही म्हणून सीमाने जाळून घेतले होते. खाजगी रुग्णालयात उपचारानंतर तिला घाटीत हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना सीमा शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास मरण पावली. तिच्यासोबत असलेल्या दिनेशला ही बाब समजताच पत्नीच्या विरहाने त्याने घाटी रुग्णालयातील दुसºया मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत दिनेश गंभीर जखमी झाला. त्यास घाटीत दाखल करण्यात आले. याविषयी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक डॉ. सुनीता मिसाळ आणि पोलीस कॉन्स्टेबल राम तपास करीत आहेत.