शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

विरोधकांनी केले भजन

By admin | Published: July 16, 2015 2:18 AM

पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करीत विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला.

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करीत विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला. दोनवेळा सभागृह तहकूब झाले. दोन्ही बाजूंचे सदस्य वेलमध्ये उतरले. गळ्यात टाळ अडकवून विरोधक भजन म्हणत अवघ्या विधान भवनात फिरले. पायऱ्यांवर बसले. माध्यमांना हे सगळे कव्हर करण्यासाठी विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर विरोधक विधिमंडळाच्या मार्गातील रस्त्यावर ठिय्या मारून बसले.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सरकार भूमिका स्पष्ट करत नाही म्हणत विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधक घोषणाबाजी करत वेलमध्ये उतरले. राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी गिरणी कामगारांना घरे देण्यास सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप करत या विषयावर कामगारांना मोर्चा काढावा लागतो हे दुर्दैव असल्याचे सांगितले. त्यावर राष्ट्रवादीचे सदस्य घोषणा देऊ लागले. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय काढला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य घोषणाबाजी करीत वेलमध्ये उतरले तसे भाजपा-शिवसेनेचे सदस्यही घोषणा देत वेलमध्ये उतरले. या गदारोळात दोनवेळा सभागृह तहकूब झाले. त्यानंतरही सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नाही हे पाहून विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार घातला. त्यानंतर सगळे सदस्य काही वेळ विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले. सलग तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी कामकाजात सहभाग घेतला नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आहेत. उद्या येतील. आज आपण चर्चा करू, सरकारची भूमिका ते उद्या मांडतील, असे वारंवार महसूलमंत्री एकनाथ खडसे सांगत होते; मात्र विरोधक ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. कर्जमाफी देणार नाही असे मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी कसे काय बोलले? जर छापून आलेले खोटे असेल तर खुलासा का करत नाहीत? अशा मागण्या विरोधकांनी लावून धरल्या आहेत.भजनसंध्या... सरकारविरोधात घोषणाबाजी करत विरोधीपक्षाच्या नेत्यांनी विधान भवन परिसरात भजन रंगवले. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव, छगन भुजबळ तसेच जयदत्त क्षीरसागर, विजय वडेट्टीवार, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड आणि डी.पी. सावंत आदी नेते उपस्थित होते. इनसेटमध्ये अजित पवार.