शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

गतिमंद कल्पस्वीची पणत्या रंगवण्याची आत्मसन्मानाची कल्पकता

By admin | Published: October 28, 2016 8:10 PM

दिवाळी हा प्रकाशाचा सण. अंधार दूर करून सकारात्मक वृत्तीने वाटचाल करण्याची दिशा प्रकाश देत असतो

मनोहर कुंभेजकर/ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 28 - दिवाळी हा प्रकाशाचा सण. अंधार दूर करून सकारात्मक वृत्तीने वाटचाल करण्याची दिशा प्रकाश देत असतो. पणत्यांना-दिव्यांना दिवाळीत खूप महत्व असते. पणत्या-दिवे तयार करणारे लाखो हात महाराष्ट्रात आहे. मात्र आपल्या गतीमंदावर मात करून वर्सोवा येथे राहणारी कल्पस्वी राणे या गतिमंद तरुणीने आपल्या घरीच विविध प्रकारच्या आकर्षक सुबक पद्धतीने पणत्या-दिवे तयार केले आहे. त्यातून अर्थाजन झाल्यामुळे तीचा आनंद ओसांडून वाहत आहे.टीव्हीचे कार्यक्रम गाणी असली तरी आपल्या कामात एकलव्यासारखी तल्लीन होऊन ती पणत्या रंगवते.तीची ही कामगिरी थक्क करणारी असून ती असामन्य आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.तीच्या पणत्यांना अटकेपार विदेशात देखिल मागणी आहे.यंदाच्या वर्षी डिशवर रंगरंगोटी,मोती,खडे लावून त्यामध्ये पणती सजऊन तीने आकर्षक पद्धतीच्या पणत्या तयार केल्या आहेत.या पणत्यांना यंदा खूप मागणी असून अत्तापर्यंत तीने सुमारे ३० हजारांच्या पणत्या विकल्याची माहिती तीची आई नीना राणे यांनी दिली.कल्पस्वी ही डाउन्स सिंड्रोम या अनुकदोषामुळे निर्माण होणाऱ्या विकाराची रुग्ण आहे. पण आपल्या या रोगावर मात करून लहानपणापासून रंगकामाची,भिंती रंगवण्याची सुद्धा आवड आहे. तिच्या या रंगवण्याच्या कला आणि जिद्दीला तिच्या आई नीलिमा राणे यांनी प्रोत्साहन दिले. यामध्ये तिला निर्मळ आनंद तर मिळतोच,पण मिळालेल्या पणत्यांच्या मागणीमुळे तिला अर्थाजन देखील होते. या दिवाळीत कल्पस्वीला पणत्या विकून यंदा तीस हजार रुपये मिळाले आहेत. मात्र पैश्यापेक्षा तिला पणत्या रंगवण्यातून जो तिला निर्मळ आनंद मिळतो,तीच्या कलेचे कौतुक होते हे आमच्यासाठी खूप महत्वाचे असते अशी प्रतिक्रिया नीना राणे यांनी व्यक्त केली आहे.कल्पस्वीला पहिल्यापासून रंगकाम करायची तीला आवड होती. मात्र ती जास्त हायपर अँक्टिव असल्यामुळे सुरवातीला तिचे रंगकाम हे त्रासदायक वाटायचे. तिला याकामी प्रोत्साहन अधिक मार्गदर्शन मिळावे म्हणून तिला रंगवण्याची पुस्तके, मातीची मडकी,रंगवण्यासाठी तबकडी तिच्या आईने आणून दिली. त्यामुळे तिला रंगकामाची अधिक आवड निर्माण होऊन तिचा रंगकामाचा स्वयंरोजगार सुरू झाला. कल्पस्वीची आई नीलिमा राणे या सेन्ट्रल बँकेच्या निवृत जनसंपर्क अधिकारी आहेत. त्या कार्यरत असताना आईबरोबर कधी कधी येणारी कल्पस्वी ही सर्वांची लाडकी होती. त्यामुळे तीने केलेल्या पणत्यांना परिचीतांकडून मागणी येऊ लागली.तीन वर्षापूर्वी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दादर येथील महाराष्ट्र चेंबर्स अंडँ कॉमर्सच्या व्यापार पेठ प्रदर्शनाला भेट दिली असता त्यांनी कल्पस्वीला बेस्ट प्राँडक्ट-बेस्ट स्टाँलचे पारितोषिक दिले होते. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद असोडून वाहत होता,त्यावेळी मला स्वर्ग ही ठेंगणा वाटू लागला अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे कल्पस्वी सारखी अनेक गतिमंद आहेत.त्याच्याकडे चिवटपणा-जिद्द असते. जर त्यांच्याकडे त्यांच्या कुटुंबाने आणि समाजाने जातीने लक्ष दिले आणि त्यांच्या कलागुणांना,कल्पकतेला वाव दिला तर अनेक गतिमंदाच्या जीवनातील अंधार दूर होऊन त्यांचे जीवन प्रकाशमय होऊन त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळेल, असे मत नीना राणे यांनी शेवटी व्यक्त केले.