राजकारणात मी सुरुवातीला शरद पवारांची यांची मुलगी म्हणून आले. तेव्हा आमच्या घरातले सगळे लोक माझ्या प्रचाराला यायचे, अजित पवार ही यायचे. माझ्याकडे सत्तेचा पर्याय होता. सत्तेत गेले असते तर आज लाल दिवा घेऊन आले असते. आज नीरा नरसिंगपूरला गेले असते. मी लहानपणापासून लाल दिवा बघते आहे. माझ्या वडिलांनी संघर्ष केला त्यांना सोडून सत्तेत जाणे मला पटले नाही, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
2013/14 साली लोक सत्ता असताना आपल्याला नाकारत होते. भाजपने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. जोपर्यंत सुषमा स्वराज, अरुण जेटली होते तोपर्यंत भाजप होता. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा फक्त शरद पवारांनी चालवला आहे. जे दोन गट झाले आहेत त्यांच्याशी लढा आहे. माझी आई आम्हाला सत्तेत असताना सांगायची महागाई वाढत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. आज काय महाग नाही ते सांगा. याला अदृश्य शक्ती जबाबदार आहे, अशी टीका सुळे यांनी केली.
आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आज ना खाऊंगा, ना खाने दुंगाचे काय झाले? आरोप सिद्ध करा नाहीतर आमची हात जोडून माफी मागा. समरजित घाडगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले त्याचे काय झाले? सकाळी 6 वाजता ईडी सीबीआयचे छापे मारले. नवाब मलिक, संजय राऊत, छगन भुजबळ, अनिल देशमुख यांनी काय केले. सुप्रिया सुळे यांची खरी ताकद त्यांची इमानदारी आहे. दिल्लीच्या अदृश्य शक्तीला नाही चित केलं तर नाव सुप्रिया सुळे सांगणार नाही, असे आव्हान सुळे यांनी दिले.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष त्यांनी त्यांच्या मुलाला दिला होता. तो पक्ष कुणी घेतला त्यांचे बघा पुढे काय होतय ते कळेलच. 105 आमदार असलेला पक्ष होता भाजपा, आज काय आहे त्यांच्याकडे? प्रफुल्ल पटेल हरले होते तरी 2004 ला मंत्री केलेले. 9 खासदार असताना अडीच वर्षे मंत्रिपदी होते. सेनेचे 18 खासदार असताना एक मंत्रिपद दिले होते, असे सुळे म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीवर डीसीएम १ असे लिहलेले असते. आमचे 105 आमदार असते तर आम्ही काय नसते सोडले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिले गेले. ठाकरे, शरद पवार, नितीन गडकरी आणि आता देवेंद्र फडणवीस यांना त्रास दिला जातोय. ज्यांचे नाव कुणाला माहिती नसते असे मुख्यमंत्री त्यांना लागतात. योगी आदित्यनाथ सोडून एक नाव सांगा. मला वाटलं होतं सगळं संपले पण लढायला मजा येतेय. माझ्या वडिलांनी साखर कारखाना काढला नाही ते बरे झाले, मला चालवता आला नसता. एकतर व्यवसाय करा किंवा राजकारण करा. दोन्ही एकत्र केलं गल्लत होते असे आज होताना दिसते, असा टोलाही सुळे यांनी लगावला.
भाजप महिलाच्या विरोधात आहे. वंदना आणि फौजिया खान या चांगल्या खासदार आहेत असे उपराष्ट्रपती म्हणतात. या दोघींनी मणिपूर महिलांच्या बाजूने मतदान केले म्हणून त्यांना अपात्र करण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोपही सुळे यांनी केला आहे.