'मलाही मुलगी आहे, म्हणूनच...; आमदार सत्यजीत तांबे मुलांना उद्देशून काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 03:12 PM2023-07-12T15:12:47+5:302023-07-12T15:14:07+5:30

आमदार सत्यजीत तांबे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात.

'I also have a daughter, that's why...; What did MLA Satyajit Tambe say to children? | 'मलाही मुलगी आहे, म्हणूनच...; आमदार सत्यजीत तांबे मुलांना उद्देशून काय म्हणाले?

'मलाही मुलगी आहे, म्हणूनच...; आमदार सत्यजीत तांबे मुलांना उद्देशून काय म्हणाले?

googlenewsNext

मुंबई- आमदार सत्यजीत तांबे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. इन्स्टाग्रावर त्यांचे रिल्सही नेहमी व्हायरल होतं असतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते तरुणांच्या लग्ना संदर्भात बोलत आहेत. आ. सत्यजीत तांबे नेहमीच रिल्समधून आपल्या मनातल्या भावना अगदी दिलखुलासपणे मांडताना दिसतात. आ. तांबे यांच्या एका पोस्टने सध्या असंच लक्ष वेघून घेतलं आहे. या व्हीडिओत ते तरुणांना अगदी आत्मियतेने एक सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे हा सल्ला लग्न आणि करिअर अशा दोन्ही गोष्टींबाबत आहे.

समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

सध्या लग्नासाठी मुलींना मुलांकडून प्रचंड अपेक्षा असल्याचं बोललं जातं. आ. तांबे म्हणतात की, कोणत्याही मुलीचा बाप हा मुलगा पाहताना तो किती कर्तृत्त्ववान आहे, हे पाहतो. मलाही मुलगी आहे. पुढेमागे ती जेव्हा तिचा जोडीदार निवडेल, तेव्हा मीदेखील तो मुलगा माझ्या मुलीची काळजी घेऊ शकेल ना, तो कर्तृत्त्ववान आहे ना, याच गोष्टींकडे लक्ष देईन. आपल्या मुलीचा उल्लेख करताना हळूवार झालेला हा लोकप्रतिनिधी आपल्यातलाच कोणीतरी एक आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

आ. तांबे म्हणाले की, साधारणपणे मुलगी बघताना ती किती सुंदर आहे, हे बघितलं जातं. तर मुलगा किती कर्तृत्त्ववान आहे, हे पाहिलं जातं. खरं तर हे बदललं पाहिजे. पण सध्या ही परिस्थिती आहे. त्यामुळे मुलांनी कर्तृत्व सिद्ध करावं, त्यांना आयुष्यात हवी ती मुलगी मिळेल. अयोग्य मार्गांनी मुलींना गळ घालण्यापेक्षा कर्तृत्वाने त्यांच्या डोळ्यात भरा,असंही तांबे म्हणाले. 

आमदार सत्यजीत तांबे याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Web Title: 'I also have a daughter, that's why...; What did MLA Satyajit Tambe say to children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.