मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मी जिवंत असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कोविच काळात मी कोमामध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या तब्येतीबद्दलच्या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्र्यांचं बारीक लक्ष होतं, असं आव्हाड यांनी सांगितलं.
शिवजयंतीबद्दल बोलताना आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं महात्म्य सांगितलं. त्याकाळी महिलांनी सती जाण्याची परंपरा होती. पण शहाजी राजे यांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी जिजाऊंना सती जाऊ दिलं नाही. महाराज प्रत्येक गोष्टीबद्दल अतिशय सहनशील आणि संवेदनशील होते, असं आव्हाड यांनी सांगितलं.
1669 मध्ये जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा सरकारी तिजोरी उघडून राजांनी रयतेला मदत केली. शिवाजी महाराज हे जगातले पहिले असे राजे होते, ज्यांनी जात धर्म पंत बाजूला ठेऊन राज्य केलं, असं आव्हाड म्हणाले.