शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

Manoj Jarange Patil मी एकटा पडलोय, आपली जात संकटात; मनोज जरांगे पाटलांचं सर्वपक्षीय मराठा नेत्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 11:37 AM

I am alone, our caste in peril; Manoj Jarange Patil appeal to all party Maratha leaders राज्यात मराठा-ओबीसी आरक्षण संघर्षात मनोज जरांगे पाटील यांनी मी एकटा पडलोय, सर्वांनी एकजूट व्हा असं विधान केले आहे.

छत्रपती संभाजीनगर - Manoj Jarange Patil on Maratha Reservation ( Marathi News ) मराठ्यांच्या जीवावर निवडून येणाऱ्या ओबीसी नेत्यांचे रंग उघडे पडलेत. सगळ्या पक्षातील ओबीसी नेते मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात जे कायद्याने दिलंय ते, त्याविरोधात एकवटलेत. मताचा विचार न करता आरक्षणाचा विचार करतायेत. परंतु मराठा नेते मतांचा विचार करत आहेत. आरक्षणाचा नाही हा फरक त्यांच्यात आणि आमच्यात आहे. आरक्षण हा विषय त्यांच्यासाठी मोठा आहे त्यामुळे मते आणि निवडून येणे त्यांच्यासाठी मोठे नाही. हीच भूमिका सगळ्या पक्षातील मराठा नेत्यांनी घेणं गरजेचे आहे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भाजपा, अजित पवार गटातील, शिवसेना शिंदे गट, शरद पवार गट, काँग्रेसचे या सर्व पक्षातील ओबीसीचे नेते एकत्रित आले. कुणाला पक्षाला मोजायलाच तयार नाही. मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही यासाठी हे सगळे एक झालेत. हे मराठा नेत्यांना दिसत नाही का? ते पदाला किंमत देत नाही. पण मराठा नेते पदाला आणि मताला इतकी किंमत का द्यायला लागलेत. मी एकटा पडलोय, मराठ्यांच्या आरक्षणाने बाजूने असल्याने मला सगळ्यांनी घेरलंय मी एकटा पडलोय. सत्ताधारी-विरोधी पक्षातील मराठा नेते बोलत नाही. त्यामुळे मराठा समाजाने एकजूट राहावे. जात संकटात सापडलीय, मराठ्यांची पोरं संकटात आहेत. ताकदीने एकत्र या असं आवाहन आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ६ जुलैपर्यंत सगळी कामे उरकून घ्या, ६ जुलैला जिथं मराठा जनजागृती रॅलीचं नियोजन केलंय तिथे एकही मराठा घरी न राहता, त्यादिवशी लग्न कार्यालाही जायचे नाही. जिल्हा जिल्ह्यात ताकदीने उपस्थित राहा. आपल्याला घेरलंय, आपली जात संकटात सापडलीय. मी एकटा पडलोय. मी हटत नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही असंही जरांगेंनी म्हटलं.

दरम्यान, शाहीरीच्या माध्यमातून आता तलवारी गंजल्या घासून ठेवा असा इशारा भुजबळांनी दिला तो धोकादायक आहे. त्यांना मराठ्यांसोबत दंगल घडवायची, जातीजातीत तेढ निर्माण करायचे आहे. मराठ्यांनी शांततेत राहावे, आपण आधी सुरुवात करायची नाही परंतु आपणही तयारीनं राहा. मराठा हा कडवट आहे. भीणारा नाही. जर यांनी तसा प्रयोग केला, हत्यारे वाटायचे काम केले, दंगली घडवायचा प्रयत्न केला तर आपण हात बांधून बसायचं नाही, कारण यांच्या हातून आपला एकही मराठा मरता कामा नये. हे राज्य शांत राहिलं पाहिजे. मराठ्यांच्या विरोधात बोलायला भुजबळांनी माणसं पेरली आहेत. भुजबळ चिथावणी द्यायला लागलेत. मराठ्यांनी सावध राहा. आपण एकटेच ५०-५५ टक्के आहोत. जर तसा प्रयोग झाला तर आमचा नाईलाज आहे. जशास तसं उत्तर देऊ. आम्ही कडवट क्षत्रीय मराठे उत्तराला उत्तर देणार असा गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी केला. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलOBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षणChhagan Bhujbalछगन भुजबळ