सावंतवाडी(जि़ सिंधुदुर्ग) : सावंतवाडी मतदारसंघातूून राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला द्यायची, ते मीच ठरविणार आणि त्याला निवडून आणण्याची हमीही मीच घेणार आहे. त्यामुळे कोणीही तिकिटासाठी गद्दारी करून गेल्यास त्याला उद्दिष्ट साध्य करता येणार नाही, असा टोला माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता उद्योगमंत्री नारायण राणो यांनी हाणला. ज्यांना दुस:या पक्षात जायचे असेल, तर त्यांनी पहिला राजीनामा द्यावा, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
राज्यव्यापी दौ:याची घोषणा केल्यानंतर ते गुरुवारी सिंधुदुर्गात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. राणो म्हणाले, पक्षाचा आग्रह आहे की, मी आणि नितेश राणो यांनी विधानसभा निवडणूक लढवावी. त्यामुळे आम्ही दोघेही निवडणूक लढविणार आहोत. मात्र, कोणत्या मतदारसंघातून ते योग्यवेळी ठरवू. यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना राणो म्हणाले, केसरकर यांनी 65क् कोटी रुपयांचा निधी आणला. ते कसे शक्य झाले, याचा शोध घ्यावा लागेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणो म्हणाले, आम्ही कोकणची माती केली, मग हे मातीत हात घालण्यास आले होते का? (प्रतिनिधी)