शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

मी पळणारा नाही, लढणारा आहे; फडणवीसांनी रणशिंग फुंकलं: अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीवरही बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 4:10 PM

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची रणनीती कशी असली पाहिजे, याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे.

BJP Devendra Fadnavis ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पीछेहाटीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विधीमंडळ सदस्यांची मुंबईतील दादर इथं बैठक पार पडली. यावेळी आमदारांना संबोधित करताना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राजीनाम्याच्या इच्छेबाबतची सविस्तर भूमिका स्पष्ट केली. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत पक्षाची रणनीती कशी असली पाहिजे, याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे. सरकारमधील जबाबदारीतून मोकळं होण्याचा मी जो विचार करत होतो, तो पक्षवाढीसाठी काम करण्यासाठी होता. मी ते निराशेतून बोललो नव्हतो, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

सरकारमधील जबाबदारीपासून मुक्त होण्याच्या विचाराबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आणि मुंबई अध्यक्षांसह पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत अतिशय उत्तम काम केलं. मात्र आपण फक्त राजकीय अरिथमेटिकमध्ये कमी पडलो.  देवेंद्र फडणवीस हा पळणारा नाही, लढणारा आहे. मी उपमुख्यमंत्रिपदावरून दूर झालो असतो तरी एकही दिवस घरी बसणार नव्हतो. चारहीकडून घेरले गेल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पूर्ण ताकदीने मैदानात उतरून सगळे किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आपली प्रेरणा आहेत. माझ्या डोक्यात काही रणनीती होती, आजही आहे. आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी काल अमितभाई शाह यांनी भेटलो. त्यांचीही भूमिका तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती. मात्र ते मला म्हणाले की, थोडे दिवस जाऊद्या. आता जे काम सुरू आहे ते सुरू ठेवा आणि त्यानंतर आपण बसून महाराष्ट्राबाबतची ब्ल्यू प्रिंट ठरवू," असा संदेश अमित शाह यांनी दिल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, "महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी ४३.९ इतकी आहे, तर आपल्यालाही ४३.६ टक्के मतं मिळाली आहेत. फक्त राजकीय गणितामुळे आपल्याला अपयश आलं, मात्र भविष्यात हे चित्र आपण बदलवू शकतो," असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

तीन महत्त्वाच्या नेत्यांची दिल्लीत खलबतं राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या नेत्यांच्या उपस्थितीत काही वेळापूर्वी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली़. या निवडणुकीत आपल्याला नेमक्या कोणत्या मुद्द्यांमुळे फटका बसला, यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांकडून मंथन केले गेले.  राज्यात पुन्हा ताकद निर्माण करून महायुतीला भरारी घेण्यासाठी काय रणनीती आखावी लागेल, यावरही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चर्चा केली गेल्याचं सांगितलं जात आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा