शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मी नाही, अजित पवारांनीच स्वतःला दिली क्लीन चिट - पृथ्वीराज चव्हाण

By admin | Published: October 01, 2014 5:15 PM

सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना मी क्लीन चिट दिलेली नसून ही क्लीन चिट स्वयंघोषीत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १ - सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी क्लीन चिट दिलेली नसून ही क्लीन चिट स्वयंघोषीत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. माधव चितळे समितीने अजित पवारांना क्लीन चिट दिली असती तर हायकोर्टाने पवार व सुनील तटकरे यांच्याविरोधात चौकशीचे आदेश का दिले असा सवालही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. 
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. सिंचन घोटाळ्याविषयी प्रश्न विचारला असता चव्हाण म्हणाले,  कायदा त्याचे काम करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना शिक्षा होणारच. कायदा व्यवस्थेत न्यायदान प्रक्रिया संथ असली तरी शेवटी न्याय मिळतो. जयललिता यांनाही १८ वर्षांनी शिक्षा झाली असे चव्हाण यांनी नमूद केले. 
राष्ट्रवादीने पूर्वनियोजीतपद्धतीने सरकार पाडण्याचे काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची मागणी केली त्यावेळीच आघाडी तुटेल याचा अंदाज आला होता. राज्य भाजपच्या हवाली करुन राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रात मंत्रिपद हवे होते असा आरोपही चव्हाण यांनी केला. राज्यात पुन्हा सत्ता आल्यास राज्यातून भ्रष्टाचाराला हद्दपार करु अशी ग्वाही त्यांनी दिली. 
महाराष्ट्राला स्वायत्तता द्या अशी मागणी करणा-या मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही चव्हाण यांनी निशाणा साधला. नेत्यांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असून देशाच्या विकासातही योगदान दिले पाहिजे असे चव्हाण यांनी म्हटले आहे.