शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

इंद्राणीच्या घटस्फोटाशी माझा संबंध नाही!

By admin | Published: February 18, 2016 6:57 AM

शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची पीटर मुखर्जीशी ओळख मी २00१ सालच्या दरम्यान करून दिली होती, पण तिचा संजीव खन्नाशी झालेल्या घटस्फोटाशी माझा काहीही संबंध नव्हता

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची पीटर मुखर्जीशी ओळख मी २00१ सालच्या दरम्यान करून दिली होती, पण तिचा संजीव खन्नाशी झालेल्या घटस्फोटाशी माझा काहीही संबंध नव्हता आणि पीटर आणि इंद्राणी यांच्या विवाहाचे निमंत्रण आपणास नव्हते, असे प्रख्यात नाटककार आणि जाहिरात क्षेत्रातील नामवंत म्हणून ओळखले जाणारे अ‍ॅलेक पद्मसी यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.मी आणि इंद्राणी २00१ सालच्या दरम्यान प्रेसिडेंट हॉटेलमधील लायब्ररी बारमध्ये गेलो होतो. तिथे आम्हा दोघांना बसायला जागा नव्हती. त्यावेळी तिथे पीटर मुखर्जी बसलेले होते. त्यांनी आम्हाला त्यांच्या शेजारची जागा आम्हाला उपलब्ध करून दिली. त्यावेळी मी त्या दोघांशी ओळख करून दिली, असे पदमसी यांनी नमूद केले आहे. इंद्राणी आयएनएक्स सर्विसेस नावाची रिक्रुटमेंट एजन्सी चालवत असल्याचे मला तेव्हा सांगण्यात आले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबईत आम्ही दोघांनी प्रेसिडेंटच्या लायब्ररी बारमध्ये भेटण्याचे ठरवले. तिथे पीटरच्या शेजारी आम्ही काही काळ बसलो होतो. नंतर मला ओबेराय हॉटेलात जायचे होते. इंद्राणीनेही माझ्यासोबत यावे, असे मी तिला सुचवले. मात्र ती पीटर मुखर्जीसोबतच बसून राहिली, असे पदमसी यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)सीबीआयला २६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या दुसऱ्या जबानीत वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती यांनी म्हटले आहे की, मी अतिरिक्त पोलीस आयुक्त झाल्यानंतर २0१२ साली मुखर्जी दाम्पत्याने आपणाशी संपर्क साधला होता. त्यांच्या एका नातेवाईकाचा मोबाइलच्या आधारे माग काढण्याची विनंती त्यांनी केली होती. दांपत्याची आणि माझी ओळख असल्याने त्यांच्या कामाची जबाबदारी मी पोलीस निरीक्षक अलकनुरे यांच्याकडे सोपवली. मात्र ते काम दोन दिवसांत झाले नाही. त्यानंतर मुखर्जी दांपत्याने माझ्याशी पुन्हा संपर्क साधला आणि सांगितले की त्या नातेवाईकाचा तपास करण्याची आता आवश्यकता नाही. त्या नातेवाईकाचा आणि आमचा संपर्क झालाआहे. त्यामुळे अलकनुरे यांनाही मी शोध थांबवण्यास सांगितले.