उस्मानाबाद-
अभिनेत्री केतकी चितळे Ketki Chitale हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे. सर्व पक्षांकडून केतकीच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला जात असताना आता सदाभाऊ खोत यांनी मात्र तिला समर्थन दिलेलं आहे. रयत क्रांती संघटनेनं केतकीनं केलेल्या पोस्टचं समर्थन केलं आहे. केतकी चितळेचा आम्हाला अभिमान आहे, असं वक्तव्य करत सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.
केतकी चितळेला मी ओळखत नाही : सुप्रिया सुळे
"केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा प्रस्थापितांविरोधात आहे", असं सदाभाऊ खोत म्हणाले. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'तुका म्हणे' या शब्दाचा वापर करून विटंबनात्मक लेखन; केतकी चितळेच्या अडचणीत वाढ
"सरकार पुरस्कृत दहशतवाद राज्यात वाढवता कशाला? देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वेगळा शब्द वापरुन टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती? अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हतं का? स्वत:वर टीका केली की सगळं आठवतं", असा जोरदार हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.
सतत वादग्रस्त विधानं करणारी केतकी चितळे आहे कोण? आजवर काय काय बोलली..
जहांगीरदारांनी गुन्हा केला तर त्याला माफ करायचं आणि इतरांनी काही केलं तर गुन्हा दाखल करायचा. तुरुंगात डांबायचं. तिला मानावं लागेल. तिनं कोर्टात स्वत:ची बाजू मांडली. तिच्या पोस्टनंतर तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या टीका-टिप्पणी एकदा पाहा. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं असहे हे धंदे आधी बंद करा, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
केतकीला शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई करा- चित्रा वाघदुसरीकडे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही केतकीला शिवीगाळ करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. केतकी चितळेच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं आहे. तसेच या ट्विटमधून त्यांनी केतकी चितळेला सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी केली आहे. "केतकी चितळे वर कारवाई झाली, आता त्याचबरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ..उघड उघड चोपायची/ जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिणींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी", अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच कायदा सर्वांना समान असतो, असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.