मुंबई : सलग पाच वेळा लोकांचा विश्वास जिंकणारा शिवसेना हा देशातील एकमेव पक्ष आहे. या मुंबईचा इतिहास पाहिला तर पूर्वी ती कशी होती आणि आता काय आहे? इतक्या वर्षांत शिवसेनेने मुंबईवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. केवळ शिवसैनिकांनी मुंबईकरांसाठी झपाटून केलेल्या कामामुळेच हे साध्य होऊ शकले. याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.दिंडोशी विधानसभेतील मालाड (पूर्व) येथील कुरारमध्ये श्री समर्थ पुस्तकालय व लोकमान्य वाचनालय संचालित अविनाश साळकर वाचनालयाचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.याप्रसंगी खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू यांच्यासह महापौर विश्वनाथ महाडेश्वर, शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर, विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष तुळशीराम शिंदे, नगरसेविका साधना माने, नगरसेवक आत्माराम चाचे, नगरसेविका विनया सावंत, माजी नगरसेवक गणपत वारीसे, माजी नगरसेविका सायली वारीसे, माजी आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम, संस्थेचे राजू मालोडकर आदी उपस्थित होते. दरम्यान, मालाड पूर्व येथील आकांक्षा अपार्टमेंटमध्ये तब्बल साडे तीन हजार चौरस फूट जागेत हे वाचनालय साकारण्यात आले आहे.
शिवसैनिकांचा मला अभिमान - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 5:52 AM