मुंबई : देशातील दलित एक्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतल्यास मी भाजपाची साथ आणि मंत्रीपद सोडायला मागेपुढे पाहणार नाही असे झी 24 तास या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले म्हणाले. रिपाईंचं अध्यक्षपद प्रकाश आंबेडकरांना द्यायलाही मी तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजपा आणि शिवसेनेच्या संबंधानबद्दल बोलतांना ते म्हणाले की उद्धव ठाकरेंची नाराजी दूर व्हावी यासाठी मोदींनी स्वतः पुढाकार घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि मी यासाठी प्रयत्न करेन.
माझी पुन्हा लोकसभेत जाण्याची इच्छा आहे. युती झाली तर शिवसेनेनं मला दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ सोडावा, अशी अपेक्षाही आठवले यांनी व्यक्त केली. काँग्रेसवर टीका करतांना ते म्हणाले की, दलितांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध मी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस करते पण आघाडीच्या राजवटीत दलितांवर अत्याचार होत असताना त्यांच्या किती मंत्र्यानी राजीनामे दिले ? आसा प्रतिप्रश्नही आठवले यांनी उभा केला.