शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

"बाबा, मी या वयात इतका फिरतोय, तू ही किमान बाहेर पड! हीच शरद पवारांची मुख्यमंत्र्यांप्रती भावना असणार.." 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 3:45 PM

सरकार चालवण्यासाठीच शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची वारंवार पाठराखण करावी लागत आहे..

पुणे : शरद पवार हे विरोधी पक्षाचे असले तरी त्यांच्या विषयी मला नितांत आदर आहे. अनेक गोष्टींना त्यांनी न्याय दिला आला आहे. अशा नेत्याला मुख्यमंत्र्यांची वारंवार भलामण करावी लागते याचं वाईट वाटत आहे. महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना मुख्यमंत्र्यांची वारंवार पाठराखण करावी लागत आहे. त्यांना वेळोवेळी प्रोटेक्ट करावे लागते. परंतु, पवार ते मनापासून करत असतील असे मला वाटत नाही. बाबा, मी या वयात इतका फिरतोय, तू ही किमान बाहेर पड असेच मुख्यमंत्र्यांप्रती शरद पवारांना वाटत असणार आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. 

पुण्यात नवरात्रोत्सवानिमित्त 'एनॅब्लर चॅरिटेबल ट्रस्ट आणि क्रिएटिव्ह फौंडेशन' यांच्यावतीने 'आत्मनिर्भर भारत अभियाना' अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना विविध वस्तू भेट वाटप कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धावत प्रवास करून पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौऱ्यावरही देखील टीकास्र सोडले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी धावपळीत केलेला नुकसानग्रस्त भागाचा दौरा उपयोगाचा नाही. त्यांनी कोरडा प्रवास करू नये. ते मुख्यमंत्री आहेत. झटपट निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत देण्यासंदर्भात निर्णय घ्यायला हवा त्यासाठी पंचनामे करत बसण्याची गरज नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यावर टीका केली.

पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करण्यात काय अर्थ आहे. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करणे गरजेचे आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे मदत मागायची असते. त्यामुळे राज्य सरकारने या कालावधीत नुकसानग्रस्तांना मदत देणे आवश्यक आहे. आणि शक्य तितक्या लवकर या मदतीची घोषणा राज्य सरकारने करावी.त्यानंतर केंद्र सरकारकडून जी काही मदत जाहीर होईल ती बोनस म्हणून समजावे.. . ...... एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर चंद्रकांत पाटलांची 'ही' मोठी प्रतिक्रिया....  गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. काहीजणांकडून तर त्यांच्या पक्षप्रवेश निश्चित केला गेला असून मुहूर्त देखील जाहीर करण्यात आला आहे. त्याचे कारण म्हणजे गेल्या काही अनेक दिवसांपासून खडसे यांनी शरद पवार व इतर राष्ट्रवादी नेते मंडळींच्या भेटीगाठी आहे. पण याही परिस्थितीत भाजपच्या नेत्यांना एकनाथ खडसे हे पक्ष सोडून जाणार नाही असा विश्वास आहे. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडच्या आमदार चंद्रकांत पाटील हे आघाडीवर आहे. 

भाजपचे नुकसान नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीही वागणार वागणार नाहीत. पुढील काही दिवसांमध्ये ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होतील. ते कुठेही जाणार नाहीत. मात्र यामुळे जे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. 

एकनाथ खडसे यांच्या भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या चर्चेवर पाटील यांनी भाष्य केले. पाटील म्हणाले, भाजपचे नुकसान नुकसान होईल असे एकनाथ खडसे कधीही वागणार वागणार नाहीत. पुढील काही दिवसांमध्ये ते पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होतील. ते कुठेही जाणार नाहीत. मात्र यामुळे जे खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेशाकडे डोळे लावून बसलेल्यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे. तसेच खडसे प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीलाही उपस्थित होते. आणि ते नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करण्यात येईल. अन् पुन्हा एकदा ते पक्ष कार्यात पुन्हा सक्रिय होतील.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण