Murlidhar Mohol : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पाच खासदारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची चर्चा सुरू आहे. मोहोळ यांना खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. दरम्यान, त्यांनी खात्याचा पदभार स्विकारला आहे. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना महापौरपासून ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास सांगितला. यावेळी त्यांनी दिल्लीतील एक किस्सा सांगितला.
लोकसभा अध्यक्षांबाबत सस्पेन्स, २६ जूनला होणार मतदान; कोण होणार लोकसभेचा स्पीकर
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चार्ज घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ही खूप मोठी जबाबदारी मिळाली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महत्वाच्या खात्याचा पदभार घेतला आहे. या खात्यामार्फत मोठं काम झालं आहे. तसेच ती काम पुढं करायचं आहे. या खात्यामार्फत खूप चांगलं काम करणार आहे, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
'मागच्या वर्षी याच मंत्रालयात कामासाठी आलो होतो'
"मी पुण्याचा महापौर असताना विमानतळाचा विषय घेऊनच दिल्लीत आलो होतो. तेव्हा मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हत की या मंत्रालयात मंत्री म्हणून येईन. पण, शेवटी आमच्या पक्षात असंच होतं. सर्वसामान्य कार्यकर्त्याला अशी संधी मिळते. आता ही देशसेवा करण्याची संधी मिळाली आहे. पुणेकरांमुळे ही मला संधी मिळाली आहे, असंही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
"या खात्याअंतर्गत काय काम करता येईल, महाराष्ट्रासाठी काय करता येईल ते पाहणार आहे. मी या मार्फत खूप चांगलं काम करणार आहे. आता या खात्यात काम शिकणार आहे, पुणे आणि महाराष्ट्र म्हणून तिथे असणाऱ्या कामांना अग्रस्थान देणार आहे. नवी मुंबईतील विमानतळांच्या कामांना वेग देणार आहे, अनेक ठिकाणी कामं थांबली आहेत. या कामांना गती देण्याचा प्रयत्न राहिलं, असंही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुण्यात मोहोळांचा दमदार विजय
शहर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी एकहाती बाजी मारली. त्यांना ५ लाख ८४ हजार ५८६ मते मिळाली. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील विजयाने चर्चेत आलेले आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) त्यांचे प्रतिस्पर्धी होते. त्यांनी लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र नेत्यांमधील गटबाजीने तो अयशस्वी ठरला. त्यांना ४ लाख ६१ हजार ४१९ मते मिळाली.