ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या पत्नी गीता निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीले आहे. या पत्रात गीता निरुपम यांनी भारतात आपल्या कुटुंबाला धोका असल्याचे म्हटले आहे. संजय निरुपम यांनी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल शंका उपस्थित केली होती.
तेव्हापासून निरुपम कुटुंबाला धमकीचे फोन येत आहेत. सर्जिकल स्ट्राईक्सच्या विधानावरुन निरुपम यांची सोशल मिडियावरही चांगलीच खिल्ली उडवण्यात आली होती. मला अनेक धमकीचे फोन आले असे गीता यांनी पत्रात म्हटले आहे.
सर्व कुटुंबाना हत्या करण्याची धमकी दिली जाते का ? मग माझ्याच कुटुंबाला का लक्ष्य केले जाते? असा सवाल गीता यांनी विचारला आहे. सध्याच्या राजवटीत देशात राहणे सुरक्षित वाटत नाही असे आमिर खानची पत्नी किरण राव म्हणाली होती. आता मलाही तसेच म्हणायचे आहे, असेही गीता यांनी नमूद केले आहे. मला माझ्या स्वत:च्या देशात असुरक्षित वाटते असे सांगतसून फोन करणारे लोक निरुपम यांच्या ८० वर्षाच्या वयोवृद्ध आईबद्दलही अपशब्द वापरतात असे गीता यांनी नमूद केले आहे.
Geeta Nirupam: Geeta Nirupam writes an Open letter to PM Shri Nar... https://t.co/1XBCWmbopt— Geeta Nirupam (@gnirupam) October 7, 2016