शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
3
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
4
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
5
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
6
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
7
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
8
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
9
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
10
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
11
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
12
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
13
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
14
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
15
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
16
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
17
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
18
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
19
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
20
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

३२व्या वर्षी प्रीती झाली १२० लेकरांची माय! बीडच्या गेवराईत उभारले ‘बालग्राम’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 6:06 AM

- सोमनाथ खताळ   लोकमत न्यूज नेटवर्क   बीड : वय अवघं ३२ वर्षे तरीही  १२० लेकरांची माय. आश्चर्य वाटलं ...

- सोमनाथ खताळ  लोकमत न्यूज नेटवर्क  बीड : वय अवघं ३२ वर्षे तरीही  १२० लेकरांची माय. आश्चर्य वाटलं असेल ना! होय, हे खरं आहे. या लेकरांच्या मायचं नाव आहे प्रीती गर्जे स्त्री-भ्रूण हत्येने देशभर गाजलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई येथे ती सहारा अनाथालय चालविते. या अनाथालयात सध्या ७१ मुलगे आणि ४९ मुली आहेत. या सर्वांचा ती एक माय म्हणून सांभाळ करीत आहे.     

स्त्री-भ्रूण हत्या,बालविवाहाने बदनाम झालेला आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा ही  बीडची ओळख. याच जिल्ह्यात ही रणरागिणी जिद्दीने आणि पती संतोष गर्जेंच्या मदतीने १२० मुलांचा सांभाळ करीत आहे. गेवराईपासून तीन किमी अंतरावरील निसर्गरम्य वातावरणातील डोंगरकुशीत सहारा अनाथालय आहे. याला ‘बालग्राम’ असेही  म्हणतात. संतोष गर्जे या तरुणाला आपल्या बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांचे झालेले हाल पाहावले नाहीत, म्हणून २००४ साली हा आश्रम उभारला. त्याच्या पंखांना लढण्याचे बळ दिले प्रीतीने.   

प्रीती मूळची यवतमाळ येथील असून,ती वकील आहे. तिचे बाबा महावितरण महामंडळात सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. लहान बहीण आणि भाऊ हेदेखील नामांकित कंपन्यांमध्ये काम करतात. घरातील परिस्थिती चांगली असतानाही तिने २०११ मध्ये संतोष गर्जे यांच्यासोबत नोंदणी पद्धतीने अवघ्या १०१ रुपयांत लग्न केले.       

आईसह ६ नातवांची आजी प्रीती १२० लेकरांची आई तर झालीच, शिवाय ५ मुले आणि १ मुलगी अशा सहा नातवांची आजी पण झाली.  प्रीती व संतोष यांनी आतापर्यंत सहा मुलांचे विवाह लावून दिले आहेत. मुलगी रेडिओलॉजिस्ट, मुलेही हुशारयाच आश्रमातील एक मुलगी रेडिओलॉजीचे शिक्षण घेत आहे. तसेच ब्युटीशियन,फाईन आर्ट,फायर इंजिनियर आदी क्षेत्रात मुली आहेत. मुलेही सीए,बीएस्सी आदी शिक्षण घेत आहेत. चार मुलगे चांगल्या पगारावर नोकरी करत आहेत.

महिन्याकाठी साडेपाच लाख रुपये खर्च  या मुलांचा सांभाळ करण्यासाठी महिन्याकाठी पाच ते साडे पाच लाख रुपये खर्च येत असल्याचे प्रीती सांगते. आर्थिक उत्पन्न काहीही नसले तरी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलेली मदत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून या मुलांची भूक भागविली जात आहे. 

टॅग्स :WomenमहिलाWomen's Day Specialजागतिक महिला दिन