अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन; सुप्रिया सुळेंनी दिले हितचिंतक शोधण्याचे 'आदेश'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:49 PM2023-06-16T12:49:54+5:302023-06-16T12:50:43+5:30
राष्ट्रवादीच्या कामाचे महाराष्ट्रात नियोजन नीट झालेले आहे. मला राज्यातील आणि लोकसभेचीही जबाबदारी दिलेली आहे. माझ्या एकटीवर जबाबदारी नाहीय, तर टीम वर्क आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
महिलांच्या सुरक्षिततेवर राज्य आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. दिल्लीमध्ये केंद्राने महिला कुस्तीपटुंची जी केस हाताळलीय, राज्यातही मरीन ड्राईव्हचे प्रकरण यावर मी राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. ही राज्यातील गृह मंत्रालय जबाबदार आहे. मी आजही देशात लोकशाही आहे असे मानते, यामुळे कोणालाही माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार आणि मी शिंदे सरकारच्या जाहिराती देणाऱ्या सारखा वेलविशर्स शोधतोय. तो मिळाला तर आमच्यासाठी विनविन परिस्थिती असेल, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. सत्तेत असलेले नेते जर जाहिराती आणि बॅनरबाजी करत असतील तर राज्याचे काम कुठे चाललेय ते दिसते. कारण हे एकमेकांना कमी लेखण्यातच व्यस्त आहेत, अशी टीका सुळे यांनी केली.
राष्ट्रवादीच्या कामाचे महाराष्ट्रात नियोजन नीट झालेले आहे. मला राज्यातील आणि लोकसभेचीही जबाबदारी दिलेली आहे. माझ्या एकटीवर जबाबदारी नाहीय, तर टीम वर्क आहे. घरात लग्न असले की एकच माणूस धावपळ करत नाही ना. यामुळे पक्षात प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिली आहे. लोकसभेच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. मी जे खासगीत बोलले ते देऊ नका, उद्या मी माझ्या नवऱ्यासोबत काही बोलले तर ते देणार का? असा सवाल सुळे यांनी माध्यमांना केला.
आमचा पक्ष आहे, आम्ही तो कसा चालवायचा ते ठरवणार आहोत. देशात ईडी, सीबीआय, आयकर विभाग सारख्या एजन्सींचा गैरवापर केला जात आहे. लोकांना, नेत्यांना घाबरविले जात आहे. भाजपात गेलेल्या एका नेत्यानेच मला आता या यंत्रणांपासून घाबरण्याची गरज नाही कारण मी भाजपात आहे, असे वक्तव्य केले होते. ते अधिकारी तरी काय करणार, त्यांना त्यांची नोकरी करायची आहे, असे सुळे यांनी सांगितले.
कॅगने आता रेल्वेतील अनियमिततेवर सवाल उपस्थित केले आहेत. परंतू, याच कॅगने कोळसा घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यावर अफरातफर झाल्याचा ठपका ठेवला होता. आता भाजपाचे सरकार आहे म्हणून कॅगच्या रिपोर्टकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे अपघातात २७५ हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तिकडे दुर्लक्ष करून कसे चालेल असा सवाल सुळे यांनी केला.