शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

मुझे तो गंगाने बुलाया है!

By admin | Published: May 10, 2014 12:55 AM

पवित्र नगरीत प्रत्येक माणूस मात्र गल्लीबोळांत गंगेचं राजकारण करताना दिसतो. ‘‘ना मुझे किसीने भेजा है! ना मै यहां आया हूं! मुझे तो गंगाने बुलाया है!’’

गजानन जानभोर

वाराणशी आसक्ती, निवृत्ती आणि मुक्ती या जीवनमृत्यूच्या कळा प्रकट करणार्‍या काशीत पाऊल ठेवणारा सामान्य माणूस गंगेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय परत जात नाही. गंगेबद्दलचा पवित्र भाव आयुष्यभर मनात असतो, पण त्याचं भांडवल तो कधी करीत नाही. या पवित्र नगरीत प्रत्येक माणूस मात्र गल्लीबोळांत गंगेचं राजकारण करताना दिसतो. ‘‘ना मुझे किसीने भेजा है! ना मै यहां आया हूं! मुझे तो गंगाने बुलाया है!’’ असे ‘हरघडी’ सांगणार्‍या नरेंद्र मोदींना यापूर्वी गंगेची हाक कधीच ऐकू आली नाही? दहा वर्षांपूर्वी केंद्रात त्यांचे सरकार होते. पंधरा वर्षांपासून गुजरातमध्ये सत्तेवर आहेत, काही काळासाठी उत्तरप्रदेशातही सत्तेवर येऊन गेले पण गंगेचे अश्रू त्यांना दिसले नाही. तिच्या आरतीसाठी म्हणे त्यांना परवानगी मिळाली नाही. गंगेच्या घाटावर रोज संध्याकाळच्या आरतीत सहभागी होणारे भक्त कुणाची परवानगी घेऊन येतात? मोदींना त्याची गरज का वाटते? ठाउक नाही! भक्ती आणि राजकारणातील हा मुलभूत फरक असावा कदाचित! केजरीवालांनी वाराणशीत पाऊल ठेवताच गंगेत स्रान केले. माहितीच्या अधिकाराच्या चळवळीतून केजरीवालांनी राजकारणास सुरुवात केली. या कायद्यातंर्गत एक प्रश्न तरी गंगेबाबत सरकारला विचारला का कधी? मोदींना आरतीच्या परवानगीची गरज भासते तशी केजरीवालांना प्रश्न विचारण्यासाठी परवानगी हवी असते का? गंगेच्या काठावर ५८ लोकसभा मतदारसंघ येतात. यात उत्तरप्रदेशचे २४, पश्चिम बंगालमधील २०, बिहारचे ११ आणि उत्तराखंडचे तीन मतदारसंघ. ऐन निवडणुकीच्या काळातच राजकीय पक्षांना तिच्या प्रकृतीची काळजी का वाटते? या प्रश्नाचे उत्तर या ५८ मतदार संघातील राजकारणात दडलेले आहे. यावेळी तर खुद्द देशाच्या पंतप्रधानांचे भवितव्य तिच्यावर अवलंबून आहे, मग उमाळा दाटून येणे स्वाभावाविकच. २७ वर्षांपूर्वी ‘गंगा अ‍ॅक्शन प्लान ’ तयार करण्यात आला. पण गंगा स्वच्छ झाली का? नाही! रामाचे नाव घेऊन गंगाजल वाटणार्‍यांना तीस वर्षांपूर्वी राजकपूर ने ‘....... गंगा मैली हो गई’असा धोक्याचा इशारा दिला पण ओलेत्या कपड्यातील गंगास्रानच तेवढे आपण लक्षात ठेवले. आता २०२० पर्यंत गंगा पूर्णत: स्वच्छ आणि तिच्यासाठी नवीन कायदा तयार करण्यात येईल असे सांगितले जाते. पाच वर्षांपासून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे रखडला आहे. सरकारने नेमकी हीच फाईल बासनात बांधून का ठेवली? या विषयावर संसदेचे कामकाज ठप्प पडल्याचेही कानावर आले नाही.

च्मतांचा प्रवाह दुभंगू नये यासाठी गंगेच्या स्वच्छतेच्या पोकळ चर्चा सुरु आहेत. त्या पुढेही सुरुच राहतील. पुढच्याही निवडणुकीत ती कुणाला तरी बोलावून घेणार आहे. काशीच्या घाटांवर दिसणारी गर्दी मतदानानंतर नेत्यांच्या मागोमाग हळहळू ओसरेल. घरी परतताना प्रत्येक जण सोबत गंगाजल घेऊन जाईल, आपले मन आणि शरीर स्वच्छ करण्यासाठी. गंगेचे काय?.. ती मात्र तशीच राहील.