शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

आईला विमानात बसविण्यासाठी मुलीनं लढवली हटके शक्कल

By admin | Published: June 24, 2017 1:50 AM

वृद्ध आईला विमानात सुखरूप बसविण्यासाठी ४२ वर्षांच्या मुलीने अनोखी शक्कल लढविल्याचा प्रकार आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहावयास मिळाला

गौरी टेंबकर-कलगुटकर लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वृद्ध आईला विमानात सुखरूप बसविण्यासाठी ४२ वर्षांच्या मुलीने अनोखी शक्कल लढविल्याचा प्रकार आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहावयास मिळाला. चक्क कॅन्सल केलेल्या तिकिटाची प्रत घेऊन तिने विमानतळावर प्रवेश करत तेथील यंत्रणेला चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र ती बाहेर पडताना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ)च्या अधिकाऱ्यांनी तिला हटकले आणि हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सहार पोलिसांनी नंदा नायडूला अटक केली आहे. मूळची भारतीय नागरिक असलेली नायडू गेल्या २५ वर्षांपासून पती आणि दोन मुलांसोबत कुवैतला राहते. कुवैतमध्ये ती एका ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये काम करते. तिचे आई-वडील नवी मुंबईमध्ये राहतात. ७५ वर्षीय आई काही दिवस कुवैतला नंदासोबत राहण्यासाठी आली होती. काही दिवसांनी आईला पुन्हा कुवैतला पाठवायचे होते. मात्र आई विमानापर्यंत एकटी पोहोचेल की नाही? विमानात जायचे म्हणजे अतिरिक्त खर्चही वाढणार होता. अशा वेळी आईला सुखरूप पोहोचवून अतिरिक्त तिकिटाचा खर्च टाळण्यासाठी तिने ही अनोखी शक्कल लढविली. नंदाने २१ जूनची दोघींची कुवेत एअरलाइन्सची ‘मुंबई-दुबई’ तिकिटे बुक केली. याची प्रत स्वत:कडे घेतली. त्यानंतर स्वत:ची ‘आॅनलाइन’ तिकीट मात्र तिने रद्द केली. मात्र स्वत:कडे बुकिंग केलेल्या तिकिटाची प्रत तिने ठेवत आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश केला. आपल्या आईला तिने कुवैत एअरलाइन्समध्ये बसविले आणि विमानतळावरून पुन्हा मागे निघाली असता सीआयएसएफच्या जवानांनी तिला हटकले. ‘तू विमानतळावरून परत का आलीस’, असे त्यांनी तिला विचारले. तेव्हा या प्रवाशांच्या यादीत माझे नाव नाही, म्हणून मी परतले असे उत्तर तिने दिले. त्यावर संशय आल्याने सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी संबंधित एअरलाइन्सकडे विचारणा केली. तेव्हा नंदाकडे असलेले तिकीट रद्द असल्याची माहिती समोर आली.