चेतन ननावरे मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावर एका १० वर्षांच्या चिमुरडीने केलेल्या भाषणाने उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. तिचीच १४ वर्षांची बहीण राणीबागेपासून आझाद मैदानापर्यंतच्या पायी मोर्चात सहभागी झाली होती. ‘आई आणि बाप दोघांनीही आत्महत्या केली असून, मायबाप सरकारही लक्ष देत नसल्याने मोर्चात सामील होण्याची वेळ आली,’ असे ती चिमुरडी सांगत होती.आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुला-मुलींचे संगोपन करणाºया आधारतीर्थ आश्रमात सध्या या दोघी राहतात. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे १४ वर्षीय श्रद्धाचे कुटुंबीय आधीच त्रस्त होेते. त्यातच व्याजाने पैसे दिलेल्या सावकाराने त्यांची जमीनही बळकावली. परिणामी, श्रद्धाच्या नैराश्यग्रस्त आई-वडिलांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. श्रद्धा सांगत होती की, गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस त्यांच्यासोबत आम्ही साजरा केला. आम्हाला कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र वर्ष उलटत आले, तरीही आश्रमाला कोणतीही मदत मिळालेली नाही. केवळ मराठा विद्यार्थिनी असल्याने अनुदान मिळत नसल्याचा आरोप नाशिकच्या आधारतीर्थ आश्रमाचे सल्लागार दीपक भदाने यांनी केला. ते म्हणाले की, आश्रमातील ९० टक्के मुले ही मराठा समाजातील आहेत. सध्या १८२ मुली व १६८ मुले अशी ३५० मुले आश्रमात आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आश्रमातील ८ शेतकºयांच्या विधवा आणि आश्रम पदाधिकारी शिधा गोळा करण्याचे काम करत असल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. म्हणूनच मोर्चात २५ विद्यार्थी आणि २५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवल्याचेही त्यांनी सांगितले.डोळ्यांत पाणी आणि मनात चीडमुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील काटोल तालुक्यातील अवघ्या चार वर्षांचा आयुष पाटील हाही या मोर्चात सामील झाला होता. पांढºया रंगाचे कपडे परिधान केलेल्या या छोट्या आंदोलकांची व्यथा ऐकून सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आणि मनात चीड निर्माण होत होती. ‘शेतकºयांना सरसकट कर्जमाफी द्या’ आणि ‘शेतकरी राजा आत्महत्या करू नकोस’, या दोन प्रमुख मागण्या असलेले फलक या चिमुरड्या आंदोलकांच्या हाती होते.
आईबाप गेले... मायबाप लक्ष देणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 4:29 AM