तुमचा दलाल महाराष्ट्रात बसला होता. राज्यपाल मला पत्र लिहून तुम्हाला साक्षात्कार होतो का असे विचारत होते. मंदिरे उघडा म्हणून सांगत होते. मी मंदिरे उघडली नाहीत. सर्व धर्मियांची उघडली नाहीत, या सर्वांनी माझे ऐकले. प्रवासी मजूरसुद्धा तिकडे जाऊन सांगत होते, आमच्या राज्यात काहीच नाही महाराष्ट्राचे सरकार आमची काळजी घेत होते. बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडा चालवताय, शिंदे गटाची शेपूट एवढी आत गेलीय. भाजपाच्या कार्यालयांवर, नेत्यांच्या बॅनरवर असे हातोडे मारण्याची हिंमत ठेवाल का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला.
देवेंद्र फडणवीस कुटुंब तुमचेही आहे; उद्धव ठाकरेंचा उघड इशारा, मुफ्तींवरूनही प्रत्यूत्तर
शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आम्ही भीक मागू, पण उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सोडणार नाही, असे मला नगरसेवकाने सांगितले. अनेकांना फोन येतायत. पोलिस करतायत. मला त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव समजलेय त्याला काय निरोप द्यायचा तो दिलाय, असे ठाकरे म्हणाले. त्यांच्याकडे खोके आहेत, आमच्याकडे जनता आहे. उपरा, दलाल येतोय आणि आमच्या मराठी माणसांवर दादागिरी करतोय. माझ्यासाठी मुंबा आई आहे तर तुमच्यासाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी असेल, असा टोला ठाकरे यांनी लगावला.
तुम्ही ज्या ज्या यंत्रणा आज वापरताय त्या सर्वांच्या आई-बापांना, नातेवाईकांना आम्ही वाचविलेले आहे. बघुया एकदा सर्वांना फिरुद्या. नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुका घेतील. ज्या पद्धतीने त्यांचे बदनाम करायचे काम सुरु आहे ते पाहता तेव्हा होतील. माझ्या घरात एकही पैसा आलेला नाही. जर चौकशी करणार असाल तर ठाणे महापालिकेची करा, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, उत्तर प्रदेश इथली देखील करा. त्यांचे शंभर अपराध भरत आलेत. जेव्हा वेळ येईल तेव्हा जशासतसे कडक उत्तर द्यायची तयारी ठेवा, असे ठाकरे म्हणाले.
कालच्या विरोधी पक्षांच्या बैठकीत मी एकटाच असा होतो ज्याच्याकडे पक्ष नव्हता, पद नव्हते, मुख्यमंत्र, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, अध्यक्षपद असे काहीच नव्हते. आपण पुरून उरणार हे त्यांना माहितीये, पण यांना माहिती नाहीय, असे ठाकरे म्हणाले. मिळेल तिथे खा ही आमची परंपरा नाही. कोरोनाकाळात मोदींनी नुसत्या थाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या. ऑक्सिजन देताना काय काय घडले ते सर्वांना माहिती आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी आहे. अनेकांच्या गोष्टी अनेकांकडे आहेत. देवेंद्र फडणवीसांनी एक लक्षात ठेवावे कुटुंब तुमच्याकडेही आहे. उद्धव ठाकरे खलनायक आहे की नाही जनता ठरवेल. पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला माहिती आहे. सूरज चव्हाण साधा शिवसैनिक आहे, असे ठाकरे म्हणाले.